साहित्य : 1 किलो देशी चिकन, 1/2 किलो कांदे चिरलेले, 2-3 लसूण पाकळ्या, 1 कप टोमॅटो बारीक चिरलेले, 1 चमचा जिरं, 1 चमचा तिखट, 2 बटाटे कापलेले, 1 लहान तुकडा दालचिनी, 3-4 वेलची, 3-4 लवंगा, 2 तेजपान, 3 मोठो चमचे तेल.
कृती : सर्वप्रथम वेलची, लवंगा आणि दालचिनी यांचे पेस्ट तयार करावे. चिकनमध्ये चिरलेल्या कांद्यापैकी अर्धे मिक्स करावे. लसणाच्या पाकळ्यासुद्धा अर्ध्या मिसळाव्या. टोमॅटो घालावे, 1/2 चमचा तिखट, जिरं आणि हळद घालावे. मीठ आणि 1 चमचा तेल लावून 2 तासासाठी मेरीनेट करावे. कढईत तेल गरम करत ठेवावे. उरलेलं जिरं घालून कांदा व लसुण परतून घ्यावे. तिखट घालून 1 मिनिट परतावे. मेरीनेट चिकन आणि बटाटे टाकावे. 5 मिनिट शिजल्यावर 1/2 वाटी पाणी घालून कमी आचेवर शिजू द्या. सर्व्ह करताना गरम मसाला वरून घालावे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा