साहित्य : ६ मटण चाप, २ अंडी, अर्धी वाटी रवा, आले, लसून, कोथिंबीर, ४ हिरव्या मिरच्या, तेल, हळद, १ चमचा तिखट, चवीपुरते मीठ.
कृती : प्रथम चाप हळद मीठ लावून वाफवून घेणे. आले, लसून, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या एकत्र वाटून त्याची पेस्ट करून घेणे. चापला पेस्ट लावून साधारण एक तास ठेवणे. नंतर एका बाऊलमध्ये अंडी फेसून घेणे त्यामध्ये चवीपुरते मीठ घालणे. गॅसवर कढईमध्ये तेल गरम करा. एक-एक चाप तिखट मिक्स केलेला रवा व फेसलेल्या अंडय़ामध्ये बुडवून तेलामध्ये तळून घ्या. कुरकुरीत आणि गरमागरम मटण चाप सव्र्ह करा.