साहित्य : 1 किलो चिकन, 2 लहान चमचे काश्मिरी लाल तिखटाची पूड, 100 ग्रॅम खसखस, 50 ग्रॅम शेंगदाण्याची पेस्ट, 10 लवंगा, 1/2 कप नारळाचा कीस, 2 लहान चमचे चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 50 ग्रॅम काजू, 2 मोठे चमचे आलं-लसणाची पेस्ट, 75 ग्रॅम चिंच, 3 मोठे चमचे तेल, मीठ चवीप्रमाणे, कडीलिंब, जिरं, 1 लहान चमचा गरम मसाला, कोथिंबीर.
कृती : एका मोठ्या भांड्यात किंवा तव्यावर खसखस, काश्मिरी लाल तिखट, शेंगदाण्याचे कूट, काजू, लवंगा, किसलेले नारळ टाकून परतून घ्यावे व त्याची बारीक पेस्ट करून घ्यावी.
एका कढईत 2-3 चमचे तेल टाकून जिरं, कढीलिंब, हिरव्या मिरच्या व आलं लसणाची पेस्ट टाकावी, मग त्यात चिकनचे तुकडे टाकून शिजवावे त्यात वाटलेला मसाला व 1/2 कप चिंचेचा घोळ टाकावा, मीठ गरम मसाला व धने पूड टाकून परतावे. 2 कप गरम पाणी टाकून त्याला शिजत ठेवावे.
ही डिश जरा तिखट व मसालेदार असते, म्हणून तयार करताना त्यात काश्मिरी तिखटाची मात्रा आवडीनुसार कमी जास्त करू शकता.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा