Article Marathi Non Vegetarian Recipes %e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%a8 %e0%a4%aa%e0%a5%87%e0%a4%aa%e0%a4%b0 %e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a4%bf%e0%a4%95 109022700015_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चिकन पेपर स्टिक

चिकन पेपर स्टिक
ND
साहित्य : 8 चिकन ब्रेस्ट पीस, पाव किलो चिकन खिमा, लहान चमचा पांढरं तिखट, 1 अंडी, शिमला मिरची (चिरलेली), लहान चमचा जायफळ पूड, एक चमचा काळेमीर पूड, 10-12 लसणाच्या पाकळ्या, एक कांदा (चिरलेला), 300 मिलीलीटर ब्राउन सॉस, 1/2 कप रेड वाइन (आवडीनुसार), 1/4 कप तेल, 20 ग्रॅम लोणी, चवीनुसार मीठ.

कृती : चिकन खिमा, मीठ, तिखट, अंडी व चिरलेली शिमला मिरची या सर्व साहित्याला मिसळून त्याचे 8 भाग करून घ्यावे. सर्व चिकन ब्रेस्ट्‍सवर मिश्रण लावून त्यांना आकार द्यावा. वरून काळे मिर्‍याची पूड टाकावी व 4-5 मिनिट फ्रिजमध्ये ठेवावे. तव्यावर तेल गरम करून त्यात चिकन ब्रेस्ट्‍सला दोन्हीकडून परतून घ्यावे.

दुसर्‍या तव्यावर लोणी गरम करून उरलेली काळ्यामिर्‍याची पूड त्यात टाकावी नंतर चिरलेले कांदे व लसूण टाकून 1 मिनिटापर्यंत परतून त्यात रेड वाइन टाकावी. ब्राउन सॉस, मीठ व चिकन ब्रेस्ट टाकून 4-5 मिनिट चिकन नरम होईस्तोर उकळावे. चिकन तुकड्यांना डिशमध्ये काढावे व उरलेले सॉस टाकून फ्रेंच फ्राइस व भाज्यांसोबत सर्व्ह करावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi