Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बर्फाचे तट पेटूनि उठले सदन शिवाचे कोसळले... १९६२ च्या भारत चीन युद्ध पृष्ठभूमीवर लिहिलेली ही कविता आहे.

Webdunia
सोमवार, 22 जून 2020 (09:26 IST)
बर्फाचे तट पेटूनि उठले 
सदन शिवाचे कोसळले
रक्त आपुल्या प्रिय आईचे 
शुभ्र हिमावर ओघळते!
 
असुरांचे पद भ्रष्ट लागुनि 
आज सतीचे पुण्य मळे
अशा घडीला कोण करंटा 
तटस्थतेने दूर पळे?
कृतांत ज्वाला त्वेषाची 
ना कोणाच्या हृदयात जळे
साममंत्र तो सारे, राणीची 
नौबत आता धडधडते !
रक्त आपुल्या प्रिय आईचे 
शुभ्र हिमावर ओघळते!
 
सह्यगिरीतील वनराजांनो, 
या कुहरातुनि आज पुढे
रक्त हवे जर स्वतन्त्रतेला 
रक्ताचे पडतील सडे
एक हिमाचल राखायास्तव 
करा हिमाचल लक्ष खडे
समरपुराचे वारकरी हो, 
समरदेवता बोलविते!
रक्त आपुल्या प्रिय आईचे 
शुभ्र हिमावर ओघळते!
 
खडक काजळी घोटुनि तुमचे 
मनगट-बाहू घडलेले
कडेकपरिमधील वणवे 
उरात तुमच्या दडलेले
काबुल-कंदाहार पथावर 
डंके तुमचे झडलेले
शिवतेजाची दीपमाळ 
पाठीशी अपुल्या पाजळते!
रक्त आपुल्या प्रिय आईचे 
शुभ्र हिमावर ओघळते!
 
कोटी कोटी असतील शरीरे- 
मनगट अमुचे एक असे
कोटी कोटी देहात आजला 
एक मनीषा जगतसे
पिवळे जहरी सर्प ठेचणे 
अन्य मना व्यवधान नसे
एक प्रतिज्ञा, विजय मिळेतो 
राहील रण हे धगधगते!
रक्त आपुल्या प्रिय आईचे 
शुभ्र हिमावर ओघळते!
 
- कुसुमाग्रज 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

पनीर गुलाब जामुन रेसिपी

सीताफळाचे चमत्कारी फायदे जाणून घ्या

घरीच बनवा हा नैसर्गिक DIY फेस पॅक त्वचेवरील टॅन काढा

शरीराच्या या 5 ठिकाणी सूज आली तर होऊ शकतो किडनीचा त्रास जाणून घ्या

जीवनसाथी चांगला मित्र होण्यासाठी हे उपाय अवलंबवा

पुढील लेख
Show comments