दिसतंय की सांभाळणं होतंय कठीण,
सैल होत चाललीय नात्यातील वीण,
एका सुंदर वळणावर थांबवायला हवं!
घुसमटी ला ओळखून, सोडून द्यायलाच हवं!
फरफटत नेण्यात काही अर्थच नाही ना!
मागून सुद्धा गेलेला काळ परत फिरणार नाही ना?
छान आठवणी मग त्यापेक्षा बऱ्या असतील,
निदान आठव येऊन, ओठावर हसू तर आणतील!
म्हणतात ना प्रत्येक नात्याचं वय असतं!
असं दिसलं की मागं फिरायचं, सोडून द्यायचं असत!
....अश्विनी थत्ते