Dharma Sangrah
✕

वाट पाहणारं दार

Webdunia
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024 (12:49 IST)
प्रत्येक घराला एक
वाट पाहणार दार असतं।
खरच सांगतो त्या
दाराच नाव आई असतं।
उबदार विसाव्याचं ते
एकमेव स्थान असतं।
प्रत्येक घराला एक
वाट पाहणार दार असतं।
 
वाट पाहणाऱ्या या दाराला
आस्थेच महिरपी तोरण असतं। 
घराच्या आदरातिथ्याच
ते एक परिमाण असतं। 
नीतिमत्तेच्या उंबरठ्याआड
मर्यादेचं त्याला भान असतं।
प्रत्येक घराला एक
वाट पाहणार दार असतं।
 
दारिद्र्याच्या दशावतारात
हे दार कधीच मोडत नसतं।
कोत्या विचारांच्या वाळवीनं
ते कधी सडत नसतं।
ऐश्वर्याच्या उन्मादात
ते कधी फुगत नसतं।
प्रत्येक घराला एक
वाट पाहणार दार असतं।
 
सुना नातवंडांच्या आगमनाला ते
तुकडा पाणी घेऊन सज्ज असतं।
लेकीची पाठवणी करताना
अश्रूंना वाट करून देतं।
व्यसनात अडखळणाऱ्या पावलांना
ते जरबेनं ताळ्यावर आणतं।
प्रत्येक घराला एक
वाट पाहणार दार असतं।
 
मित्रांनो,
उभ्या आयुष्यात फक्त
एकच गोष्ट जपा।
उपहासाची करवत
या दारावर कधी चालवू नका।
मानापमानाचे छिन्नी हातोडे
या दारावर कधी मारू नका। 
स्वार्थी अपेक्षांचे खिळे 
या दारावर कधी ठोकू नका।
घराचं रक्षण करणाऱ्या या दाराला
कधीच मोडकळीला आणू नका।

- सोशल मीडिया

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

नवीन

Tiffin Snacks Recipe मुलांना हे ५ हेल्दी टिफिन स्नॅक्स नक्की आवडतील, पाककृती लक्षात घ्या

Children's Day 2026 Quotes in Marathi बालदिनानिमित्त सुंदर कोट्स आणि शुभेच्छा

टम्म फुगणाऱ्या आणि खुसखुशीत बेसन पुऱ्यांचे सिक्रेट: पीठ मळण्याची अचूक पद्धत

पहिल्या भेटीतच समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडायची आहे? या गोष्टी लक्षात ठेवा

थंडीच्या दिवसांत तूप किंवा खोबरेल तेल घट्ट गोठतंय? डब्यात टाका फक्त 'ही' एक गोष्ट, तेल राहील नेहमी पातळ

पुढील लेख
Show comments