Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

Marathi Kavita : चांदण्या सारखी फुलायची चमेली दारी

Marathi Kavita : चांदण्या सारखी फुलायची चमेली दारी
, शुक्रवार, 16 जुलै 2021 (18:17 IST)
चांदण्या सारखी फुलायची चमेली दारी,
सुगन्ध च सुगन्ध पसरे आमच्या घरी!
पारिजात ही पाडे सडा फुलांचा,
देऊन टाकणं हाच मूळ स्वभाव त्याचा,
जास्वदं ही फुले भरभरून, लाल लालचटूक,
वाहता त्यास "श्री"शिरावर, शोभून दिसे मस्तक,
रंगबिरंगी शेवंती चा होता थाटमाट,
मंद मंद सुवास पसरे, नुसता घमघमाट!
अबोली आपली कोपऱ्यात उभी असें,
कुंद कळ्यांची नेहमीच तिची मैत्री असे,
येता चैत्र येतसें बहर मोगऱ्यास फार,
मोहून घेई चित्ता सुगन्ध, पसरे चौफेर ,
असें छोटे मोठे फुलझाडं होते अंगणी माहेरी,
सुगंध त्याचा घेऊन ओच्यात,आले मी सासरी!
...अश्विनी थत्ते

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

स्प्राउट्स खाण्याचे फायदे केवळ फायदेच नव्हे तर तोटे देखील आहेत, जाणून घ्या सेवन करण्याची योग्य पद्धत