Publish Date: Sat, 19 Mar 2022 (16:06 IST)
Updated Date: Sat, 19 Mar 2022 (16:10 IST)
काय दडलंय कुणाच्या मनात कसं बरं कळेल,
प्रत्येक जण च आहे कसलेला नट,अवघड होऊन बसेल,
आरसा आहे म्हणतात" चेहेऱ्याला",पण तो ही फसवतो,
बेमालूमपणे लपवतो, आरस्यास बदनाम करतो,
मग कसा ठेवायचा विश्वास, कुणी कुणावर,
की माणसावर ठेवायचाच नसतो विश्वास,हेंच भाष्य यावर,
कठीण होतोय माणुसकीचा प्रवास अजून अजून,
झिरपत नाही ती आता प्रत्येक हृदयातुन!