गेलेला दिवस कधी येत नसतो
येणारा दिवस खूप उत्साही असतो
नवीन आशा नवीन उमेद घेउन येतो
आपण या आलेल्या नवीन दिवसाची,
आहुति अतीताच्या होमकुंडात घालत असतो
आणि हे स्वाहा होताना पाहात असतो
परत उगविणाऱ्या, पुन्हा येणाऱ्या
सुखी आणि उत्साही दिवसाची वाट पाहतो
परत त्याची तीच विल्हेवाट लावतो
या दिवसाची अतीताची आहुति न व्हावी
हे काळाचे भक्ष्य न बनता
व्यतीताचे सार्थक लक्ष्य व्हावे
आठवणीतील तारे व्हावे
याच्याकडून काहीतरी असे व्हावे
जे चिर संचित राहून
अखेरच्या श्वासापर्यंत साथ देईल असे