Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रिय सखी.. आयुष्य जगून घे....

Marathi kavita for women
प्रिय सखी.. आयुष्य जगून घे....
मी म्हणते बिनधास्त जग 
चिंता नको करू 
कुणा बद्दल मना मध्ये 
राग नको धरू     ll
 
जे काय वाईट घडलं 
त्याला लाव काडी 
वर्तमानात जग जरा 
मजा घे थोडी       ll
 
संकट येत राहतील 
घाबरून नको जाऊ 
कोणत्याच गोष्टीचा 
करू नको बाऊ     ll
 
भिऊ भिऊ रोजच जगतेस 
जरा मोकळा श्वास घे 
मित्र-मैत्रिणी जवळ कर 
आणि थोडी मजा घे        ll
 
चौकटीत राहून राहून 
कंटाळा येणारच 
चार चौघात बसल्यावर 
दुःख पळून जाणारच  ll
 
स्त्री झाली म्हणून काय 
तिला मन नसतं का ?
गुलाबी , लाल रंगाचं 
तिचं वाकडं असतं का ?
शेजारणींनी , मैत्रिणींनी 
एकत्र आलं पाहिजे 
रंग खेळून मन कसं 
चिंब झालं पाहिजे   ll
 
मोठं झाल्या नंतर सुद्धा 
लहान होता येतं
मुखवटा न घालता 
आयुष्य जगता येतं     ll
 
गप्पा मार , जोक सांग 
खळखळून हास 
अर्धी भाकरी जास्त घे 
म्हणू नको बास        ll 
 
मन मोकळं जगल्यानं
ब्लडप्रेशर होतं कमी 
अटॅक बिटॅक येणार नाही 
याची अगदी नक्की हमी     ll
 
गप्पातल्या lnsulin ने 
Sugar कमी होते 
हृदयाच्या ठोक्यांची 
गती धीमी होते 
धुळवड साजरी करणं म्हणजे 
वाया जाणं नसतं 
गडगडाटी हंसणं म्हणजे 
खरं Tonic असतं 
एक दिवस पत्ते खेळल्यानं 
जुगारी थोडंच होतं 
टेन्शन कमी झालं की 
जगणं सोपं होतं       ll
 
कितीही चांगलं वागलं तरी 
जग वाईटच म्हणणार आहे 
तुझा कोण भव्य - दिव्य 
पुतळा वगैरे उभारणार आहे  ?  ll
 
म्हणून म्हणते आता तरी
मनावरचं ओझं झुगारून दे
मोकळेपणाने श्वास घेऊन बघ
आणि.....थोडं जगून घे    ।।

- सोशल मीडिया

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कैरीचा आंबटपणा आरोग्यासाठी आहे फायदेशीर