आयुष्य निघून चाललंय, रेती सारख सुटून,
जाता जाता काही आठवणी तरी वाटतंय, ठेवाव्या जमा करून,
निवांत बसेन जेंव्हा आयुष्या च्या उत्तरार्धात,
हसू आणावं त्यांनी गालावर, एका क्षणात,
हीच शिदोरी पुरेल असं वाटत संपणाऱ्या रस्त्यावर,
पण जसं जवळ करावं क्षणांना, ते उडतात वाऱ्यावर,
हात उंचावून पकडण्याचा एक निरर्थक माझा प्रयत्न,
जे लिहून ठेवलंय नशिबात, तेच असतं होणं,
समजवायच स्वतःलाच पुन्हा गोळा करू आठवणी चांगल्या,
येतीलच त्या अवतीभवती, निवडून घेऊ त्यातल्या!