rashifal-2026

इतके मला पुरे आहे

Webdunia
गुरूवार, 25 जुलै 2024 (20:33 IST)
इतके मला पुरे आहे
बसायला आराम खुर्ची आहे 
हातामध्ये पुस्तक आहे 
डोळ्यावर चष्मा आहे 
इतके मला पुरे आहे  ।।१।।
 
निसर्गामध्ये सौंदर्य आहे 
निळे आकाश आहे 
हिरवी झाडी आहे 
सूर्योदय, पाऊस, इंद्रधनुष्य आहे 
इतके मला पुरे आहे ।।२।।
 
जगामध्ये संगीत आहे 
स्वरांचे कलाकार आहेत 
कानाला सुरांची जाण आहे 
इतके मला पुरे आहे ।।३।।
 
बागांमध्ये फुले आहेत 
फुलांना सुवास आहे 
तो घ्यायला श्वास आहे 
इतके मला पुरे आहे ।।४।।
 
साधे चवदार जेवण आहे 
सुमधुर फळे आहेत 
ती चाखायला रसना आहे 
इतके मला पुरे आहे ।।५।।
 
जवळचे नातेवाईक आहेत 
मोबाईलवर संपर्कात आहेत 
कधीतरी भेटत आहेत 
इतके मला पुरे आहे ।।६।।
 
डोक्यावरती छत आहे 
कष्टाचे दोन पैसे आहेत 
दोन वेळा दोन घास आहेत 
इतके मला पुरे आहे ।।७।।
 
देहामध्ये प्राण आहे 
चालायला त्राण आहे 
शांत झोप लागत आहे 
इतके मला पुरे आहे ।।८।।
 
याहून जास्त आपल्याला काय हवे आहे ?
जगातील चांगले घेण्याचा,
आनंदी आशावादी राहण्याचा
विवेक हवा आहे !!!
इतके मला पुरे आहे ।।९।।
 
विधात्याचे स्मरण आहे 
प्रार्थनेत मनःशांती आहे 
परमेश्वराची कृपा आहे 
इतके मला पुरे आहे ।।१०।।
 
- सोशल मीडिया

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

झोपण्यापूर्वी हे एक तेल तुमच्या नाभीला लावा; शरीराच्या अनेक समस्या नाहीशा होतील

Marathi Essay on माझे आवडते शिक्षक

वजन वाढणे आणि श्वासाच्या त्रासावर प्रभावी आहे अर्धचक्रासन, फायदे जाणून घ्या

नैतिक कथा : चिमणी आणि झाडाची गोष्ट

अगदी ढाब्यासारखी चव आणि बनवायलाही खूप सोपी Malai Egg Curry Recipe

पुढील लेख
Show comments