स्वभावाच्या असतात कित्तीतरी नाना तऱ्हा,
कुणाचा खूपच खराब, कुणाचा थोडा बरा!,
तापट भयंकर असतं कुणी,कोणी कोमल हृदयी,
काहीचा स्वभाव बदलत असतो ठायी ठायी,
संशय असतो सतत सोबत कुणा कुणाच्या,
असमाधान स्वभावात जात्याच बऱ्याच जणांच्या,
कित्ती ही दुःख असो, कधी ते दाखवत नाही,
संतुष्ट, आनंदी स्वभाव असतो वेगळाच काही,
अश्या विविधतेने मानवी स्वभाव असतो,
अश्याच लोकांनी समाज तयार होतो!