Publish Date: Sun, 26 Feb 2023 (13:40 IST)
Updated Date: Sun, 26 Feb 2023 (14:04 IST)
तुझी माझी मैञी
काय सांगू आहे कशी
थोडी गोड थोडी तिखट
कधी गडद , कधी फिकट
पण वाटे नेहमी हवी शी
तुझी माझी मैत्री
काय सांगू आहे कशी
कधी अबोल कधी बडबडी
कधी शांत कधी गडबडीत
पण वाटे नेहमी हवी शी
तुझी माझी मैत्री
काय सांगू आहे कशी
कधी हळवी कधी खंबीर
कधी हसरी कधी गंभीर
पण वाटे नेहमी हवी शी
तुझी माझी मैञी
काय सांगू आहे कशी
सौ. शिल्पा मोघे