Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हवा हवासा गारवा आला हवेत

marathi poem
, सोमवार, 23 नोव्हेंबर 2020 (11:16 IST)
हवा हवासा गारवा आला हवेत,
गुलाबी थंडी न घेतलं मज कवेत,
कोवळे ऊन पडे सुखद अंगावरी,
धुक्याची शाल ओढून बसली वनश्री,
पहाट वारा लावी वेड माझ्या जीवास,
करावा वाटतो कुठंतरी लांबवर प्रवास,
जाऊच नये वाटते, हे वातावरण प्रसन्न,
गवसली वाटते मज सुखाची खाण!
आल्यासारखी रहा इथं काही काळ तरी,
खूप करीन गुजगोष्टी, तुजसी ही आस अंतरी!!
....अश्विनी थत्ते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Low BP झाल्यास घरगुती उपचार