आतून वेदना, चेहेऱ्यावर हसू आणतो,
कित्ती सुंदर अभिनय, आपण आयुष्यात करतो,
आवडलेली व्यक्ती नसली तरीही हसून करतो स्वागत,
भेटायची इच्छा नसली तरी असतो आपण भेटत,
हे सर्व करताना चेहऱ्यावर मुलामा वेगळा असतो,
असं नाटक आपण जीवनात बरेचदा करतो,
बळेबळे हसू ओठावर असतं, आत चालत काहीं भलतंच असतं,
कुणाला काही कळू नये ,हेच सदा मनी वसत .
काम करायची अजिबातच नसते इच्छा, पण आवडीने करतोय दाखवतो,
असं च आपण नाटक क्षणोक्षणी करतो,
काही घटना आठवताच पाणी येतं डोळ्यात .
पण लीलया ते पुसत आपण सज्ज होतो जे करायला आलंय पुढ्यात.
कसलेले कलाकार मंडळी असतो की आपण,
भूमिका वेगवेगळ्या असतात,साकारतो सर्वजण!