चाहूल कशाचीही असो, उत्कंठा वाढवते,
पुढं काय याची हुरहूर जीवा उगी लागते,
नुसती चाहुल लागली, की त्या वाटेकडे डोळे लागतात,
अंगावर कधी कधी रोमांच उभे राहतात,
बाळाची चाहूल जेव्हा आईला लागते,
त्याक्षणी ती आई होऊन त्याची वाट बघत बसते,
लग्नाळू जीव, प्रियकराच्या चाहूल अचूक टिपते,
निसर्ग ही ऋतू बदलाची चाहुल देतेच देते,
कोण कोणती चाहूल उगी जीवाची धडधड वाढवी,
भीतीने जीवाची भांभेरी ती उडवी,
ओळखता यायला हवी, येण्याऱ्या चाहूल चे भाकीत,
ठरवता येईल कसं सामोरं जायचय त्याची रीत.