नातीगोती असावीत नेहमी आंबट गोड चवीची,
रंगत वाढवतात ते सदाच आपल्या आयुष्याची,
हाक मारली की धावून येतात पटकन,
नड भासली कशाची, की भागवतात चटकन,
कार्याची शोभा का उगाचच बरं वाढते,
त्यांच्या मूळ च तर , ते खुलून दिसते,
हास्याचे कारंजे उडतात घरी वरचेवर,
तोडगा लगेचच मिळतो, घरगुती कुरबुरीवर,
राग मनात न ठेवता, प्रवाहतीत व्हावं,
आपलं म्हटलं की सोडून ही देता यायला हवं!
मंगच हे अस नातं लोणच्या सारख टिकत,
जितकं जून होत जातं, तितकं रुचकर होत जातं!
....अश्विनी थत्ते