Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

असे जगावे दुनियेमध्ये

Webdunia
शनिवार, 19 मार्च 2022 (13:00 IST)
असे जगावे दुनियेमध्ये,
आव्हानाचे लावुन अत्तर,
नजर रोखुनी नजरे मध्ये,
आयुष्याला द्यावे उत्तर..
 
नको गुलामी नक्षत्रांची,
भीती आंधळी ताऱ्यांची,
आयुष्याला भिडतानाही,
चैन करावी स्वप्नांची..
 
असे दांडगी इच्छा ज्याची,
मार्ग तयाला मिळती सत्तर,
नजर रोखुनी नजरे मध्ये,
आयुष्याला द्यावे उत्तर..
 
पाय असावे जमिनीवरती,
कवेत अंबर घेताना,
हसू असावे ओठांवरती,
काळीज काढुन देताना..
 
संकटासही ठणकावुन सांगावे,
आता ये बेहत्तर,
नजर रोखुनी नजरे मध्ये,
आयुष्याला द्यावे उत्तर..
 
करुन जावे असेही काही,
दुनियेतुनी या जाताना,
गहिवर यावा जगास सा-या,
निरोप शेवटचा देताना..
 
स्वर कठोर त्या काळाचाही,
क्षणभर व्हावा कातर कातर,
नजर रोखुनी नजरे मध्ये,
आयुष्याला द्यावे उत्तर...
 
कवी गुरू ठाकूर

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवासमोर काढा वाराप्रमाणे रांगोळी

दिवाळीत या जीवांना पाहणे शुभ मानले जाते, जाणून घ्या काय महत्त्व

धनत्रयोदशीला मीठ का खरेदी करावे?

Kiwi for Skin Glow किवीचा वापर करून तजेल त्वचा मिळवा

पेट्रोलियम जेलीचे फायदे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

दिवाळी फराळ रेसिपी : खमंग शेव

3000 वर्ष जुना हा मसाला आहे आरोग्यासाठी वरदान, शरीराला होतील हे 6 फायदे

12वी कॉमर्स नंतर टॉप अकाउंट्स आणि फायनान्स कोर्स करा

या दिवाळीत, फक्त या एका ब्युटी सिक्रेटसह, तुम्हाला पार्लरपेक्षा घरी चांगली चमक मिळेल

रात्री झोपण्यापूर्वी नाभीमध्ये तेल लावण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments