काय बाबा वरुण राजा?काही घडले काय?
सूर्याशी तुझं भांडण वगैरे झालं की काय?
पार झोडपून काढतोय तू, अगदी पावसाळ्या परी,
सुर्या वर तुझी नाराजगी इतकी नाही बरी,
आमचं तर फावतय रे!, गर्मीतून सुटका झाली,
पण मात्र बळीराजा ची चांगलीच पंचाईत की रे जाहली,
उभी पिकं गेली की रे झोपून, नुकसान कित्ती भारी!
डोळ्यात बिचाऱ्याच्या पाणी, तुझं म्हणणं काय आहे तरी?
अवकाळी कोसळण चांगलं का आहे ?
मिटवून टाक न तुझं भांडण, बरंय का हे?
ज्या त्या ऋतूत , ते ऋतू बरे वाटतात,
सर्वांचच बर चालतं मग, मोकळा श्वास घेतात!
..अश्विनी थत्ते.