suvichar

''पानं'' सुंदर वर्णन

Webdunia
मंगळवार, 10 मार्च 2026 (16:59 IST)
पानं
काही पानं खुडायची असतात. - (चहा)
काही पानं वाढायची असतात. - (केळी, भोजन)
काही पानं चिरायची असतात. - (कोथिंबीर)
काही पानं शिजवायची असतात. -(पालक, मेथी)
काही पानं तळायची असतात. -(अळू, कढीपत्ता)
काही पानं खायची-रंगवायची असतात. -(नागवेल, विडा)
काही पानं कुटायची असतात. - (पुदिना)
काही पानं लुटायची असतात. - (आपटा)
काही पानं पुरायची असतात. - (पालापाचोळा कंपोस्ट)
काही पानं जपायची असतात. - (पिंपळ)
काही पानं तोरणात सजवायची असतात. - (आंबा)
काही पानं केसात माळायची असतात. - (केवडा)
काही पान वाहायची असतात. - (बेल)
काही पानं मानाची असतात.- (नागवेली)
काही पानं खमंग फोडणी साठी असतात. - (कढीपत्ता)
काही पानं शेवटी सोबती येतात. - (कडबा)
काही पानं हातावर रंगवण्यासाठी असतात. - (मेहंदी)
काही पानं नैवेद्याच्या परिपुर्णतेसाठी असतात.  - तुळस)
काही पानं फक्त स्वादासाठी असतात. - (पुदिना)
काही पानं मसाल्यासाठी असतात.  - (तेजपत्ता)
काही पानं सुशोभिकरणासाठी असतात. - (नारळाच्या झावळ्या)
काही पानं पत्रावळी बनविण्यासाठी असतात. - (पळस)
काही पानं तल्लफ भागविणारी असतात.- (तंबाखू)
काही पानं सत्यनारायण पूजा साठी उपयुक्त असतात.- (कर्दळी)
काही पानं गणपतीला आवडतात. - (आघाडा, हराळी)
काही पानं भरायची असतात. -  (वही)
काही पानं जोडायची असतात. - (पुरवणी)
काही पानं लपवायची असतात. - (प्रगती पुस्तक)
काही पानं उलटायची असतात. - (भूतकाळ, दुःखाचे क्षण)
काही पान तोंडाला पुसायची असतात. -  (आश्वासन )
तर काही नवीन पानं उघडायची असतात. 
काही पानं खेळायची असतात - (पत्ते)

- सोशल मीडिया

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

खरे प्रेम आणि आकर्षण यात फरक कसा ओळखाल?

Career in Bachelor of Occupational Therapy BOT : बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

चेहऱ्यावर ब्लीच लावताना या चुका करणे टाळा, दुष्परिणाम होऊ शकतात

रात्री उशिरा जेवण करणाऱ्यांनी एकदा नक्की वाचा; शरीरावर होतात हे परिणाम

डिटॉक्स ड्रिंक की फक्त ट्रेंड? सकाळी काय प्यावे याबाबत डॉक्टरांचा सल्ला जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Flavor Shrikhand गुढीपाडवा विशेष श्रीखंडाचे हटके आणि ट्रेंडी फ्लेवर्स नक्की ट्राय करा

गुढीपाडव्याला बनवली जाणारी आदर्श थाळी; आरोग्य, समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक

मेंदू तेज करण्यासाठी मुलांना द्या हे सुपरफूड्स

गुढीपाडव्याला कडुलिंब-गूळ का खातात?

Gudi Padwa 2026 Essay in Marathi गुढीपाडवा निबंध मराठी

पुढील लेख
Show comments