काही न काही विकून खळगी पोटाची भरायची
आज आला सूर्य टोपलीत,तयारी विकून टाकायची!
निघाले बिगिबिगी, हाती धरलं पोराला!
लवकरच गाठायचं होतं मला बाजाराला!
वाटेत लागलं देऊळ हात जोडले त्याला,
भेटला का गं देव?त्याने पुसलं मला!
मी मानेन चं म्हटलं त्याला
नाही गं बाई !
तो म्हणाला जो दिसतोय त्यालाच विकायची तुला घाई!
बाकी तर देव दिसत बी नाही गं माय
कशाला विकते ह्याला, निदान दिसून भलं तर करतो हाय!
पटलं मला पोराचं म्हणणं,
दिला सूर्याला सोडून,
तो ही गेला पटकन परत,
दिलं चांदोबा ला धाडून!
अश्विनी थत्ते