Festival Posters

एक सुरेख प्रार्थना

Webdunia
शनिवार, 30 जानेवारी 2021 (12:05 IST)
गळ्यामधे माळ दे, हाता मध्ये टाळ दे।
देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे॥
 
संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये तान दे।
तुझे गीत गाता यावे असे वरदान दे॥
 
मायेसाठी माय दे, वारी साठी पाय दे।
तुझी कृपा कामधेनू, अशी एक गाय दे॥
 
दिवस भर काम दे, पोटापुरता दाम दे।
चिंता दूर करावया ओठी तुझे नाम दे॥
 
कष्ट आणि चारा दे, सोसायाला जोर दे। 
खांद्यावर देवा, तुझ्या पालखीचा भार दे॥

ध्रुवापरी स्थान दे, कर्णापरी दान दे।
श्रावणाच्या सेवेपरी थोडसं ईमान दे॥

तुकोबाची वीणा दे, ज्ञानियाची करुणा दे।
मूर्त डोळा, पायी माथा ठेवुनीया मरणा दे॥

मागू किती राहू दे, सारे एके ठायी शोभु दे।
वाट दाखवण्या गुरू, जन्मो जन्मी लाभू दे॥

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

नवीन

चालणे की जिम? काय चांगलं आहे, संशोधन काय सांगते?

हे ४ प्रश्न कोणालाही विचारू नका, नात्यात दुरावा येऊ शकतो

लघु कथा : ज्ञानी मेंढपाळ आणि राजाचे तीन प्रश्न

एकेकाळी सामान्य वाटणारी ही गोष्ट आज लक्झरी बनली आहे

आंब्याची सालं फेकून देण्यापूर्वी, त्यांचे हे ६ अद्भुत उपयोग नक्की जाणून घ्या

पुढील लेख
Show comments