Dharma Sangrah

पुन्हा वाटते.

Webdunia
शनिवार, 19 जून 2021 (16:10 IST)
पुन्हा वाटते तसेच इवले बाळ होऊनी कुशीत यावे 
अन् पदराच्या अभयाखाली डोळ्यांनी हे पंख मिटावे'
 
हळूच पाहावे पांघरूणातून 
ओढूनिया अंगावर माया
 निरखावी मग अंधारावर
 जरतारी कशिद्याची किमया'
 
अन तुझिया हृदयाची धडधड
 इवल्याश्या गालास कळावी 
खोल, संथ श्वासांची चवरी
 टाळूवरती सतत ढळावी’
 
आशांच्या नवलाख कळ्यांनी
 स्वप्नंवेल तव डवरून जावी 
तुझ्याच अंगाचा अवयव मी, 
अशीच काही जाणीव व्हावी
हव्याहव्याची हाव निवावी, 
सुकेसुके गंगेत नहावे...
 
- विंदा करंदीकर.
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

आरोग्यासाठी अत्यंत पोषक असा पदार्थ; डाळिंबाचा रायता पटकन लिहून घ्या रेसिपी

Sunday Born Baby Boy Names रविवारी जन्मलेल्या मुलांसाठी सूर्यदेवाशी संबंधित युनिक आणि अर्थपूर्ण नावे

कस्तुरबा मोहनदास गांधी यांची माहिती

फुफ्फुसाचा संसर्ग टाळण्यासाठी घरगुती उपाय

एमबीए फॅमिली बिझनेस मॅनेजमेंट मध्ये करिअर

पुढील लेख
Show comments