Dharma Sangrah
✕

तुझं गुपित

Webdunia
शनिवार, 24 डिसेंबर 2022 (08:30 IST)
मैतरणी ग सांग साजणी गुपीत समदं मला
कशाचा ध्यास तुला लागला?
 
झुंजुरकाचं काखंवरती घेऊनिया घागर
एकली जातिस ओढ्यावर!
गुरं वासरं पार पिटाळुन वरल्या माळाकडं
झटकशी उन्हांत कोणाकडं?
 
शिरवाळीचं ओघळीतल्या निवत्या वाळूवर
बांधिशी कुणासंगाती घर?
कां घुटमळशी ग कडुसं
 
पडल्यावर? 
कां अल्याड चुकती रानिं तुझी वासरं?
 
ती रोजच घुमते शीळ कुणाची बरं?
करंजाखालीं कोण भेटतौ शमलेवाला तुला?
कशाचा ध्यास तुला लागला?
 
पिंपरणीचीं कवळीं पानं उन्हात व्हावीं तशी
कशानं मलूल झालिस अशी?
गालांवरती रसरस करिती मुरमाच्या पुटकुळ्या
चुरडल्या ओठांच्या पाकळ्या
 
कशी विरलि ग नवीन चोळी बाई छातीवर
पिचकले हातांतील बिलवर?
 
घे उरकुन आतां लौकर साखरपुडा
ह्यो खुळ्या पिरतीचा रस्ता लइ वांकडा
ह्यो लागो परता बोल तुला वावडा
पिकल्या आंब्यावरचा राघू चुकवुन जाईल तुला
द्वाड ह्यो इष्काचा मामला?
 
- ग. दि. माडगूळकर (गदिमा)

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

नवीन

तुम्हाला पैसे वाया घालवायचे नसतील तर मोसंबी खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा

Shree Balasaheb Thackeray Smrutidin 2026 Vinmra Abhivadan हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन संदेश

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे प्रभावी व्यक्तिमत्त्व निबंध

हिवाळ्यात गाजरापासून बनवता येणाऱ्या अतिशय पौष्टिक रेसिपी Healthy Carrot Recipes

आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिनाचा इतिहास अणि महत्त्व जाणून घ्या

पुढील लेख
Show comments