Marathi Biodata Maker

सायंकाळी रानांत चुकलेलें कोकरुं (सावरकरांची कविता)

Webdunia
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020 (16:48 IST)
चाल- नृपममता रामावरती सारखी
कां भटकसि येथें बोलें। कां नेत्र जाहेले ओले
कोणि कां तुला दुखवीलें। सांग रे
धनि तुझा क्रूर की भारी । का माता रागें भरली
का तुझ्यापासुनी चुकली । सांग रे
हा हाय कोंकरुं बचडें। किति बें बें करुन अरडे
उचलोनि घेतलें कडे। गोजिरें
कां तडफड आतां करिसी। मीं कडें घेतलें तुजसी
चल गृहीं चैन मन खाशी। ऐक रे
मी क्रूर तुला का वाटे। हृदय हें म्हणुनि का फाटे
भय नको तुला हें खोटें। ऐक रे
हा चंद्र रम्य जरि आाहे। मध्ययान रात्रिमधिं पाहे
वृक वारुनि रक्षिल ना हें। जाण रे
तों दूर दिसतसे कोण। टपतसे क्रूर बघ यवन
गोजिरी कापण्या मान। जाण रे
कमि कांहिं न तुजलागोनी। मी तुला दुध पाजोनी
ही रात्र गृहीं ठेवोनी। पुढति रे
उदईक येथ तव माता। आणीक कळपिं तव पाता
देईन तयांचे हातां। तुजसि रे
मग थोपटुनी म्यां हातें। आणिलें गृहातें त्यातें
तो नवल मंडळींनातें। जाहलें
कुरवाळिति कोणी त्यातें। आणि घेति चुंबना कुणि ते
कुणि अरसिक मजला हंसते। जाहले
गोजिरें कोंकरुं काळें। नउ दहा दिनांचे सगळें
मउम केश ते कुरळे। शोभले
लाडक्या कां असा भीसी। मी तत्पर तव सेवेसी
कोवळी मेथि ना खासी। कां बरें
बघ येथें तुझियासाठीं। आणिली दुधाची वाटी
परि थेंब असा ना चाटी। कां बरें
तव माता क्षणभर चुकली। म्हणुनि का तनू तव सुकली
माझीही माता नेली। यमकरें
भेटेल उद्यां तव तुजला। मिळणार न परि मम मजला
कल्पांतकाल जरि आला। हाय रे
मिथ्या हा सर्व पसारा। हा व्याप नश्चरचि सारा
ममताही करिते मारा। वरति रे
ह्या जगीं दु:खमय सारें। हीं बांधव पत्नी पोरें
म्हणुनियां शांतमन हो रे। तूं त्वरें
तरि कांहिं न जेव्हां खाई। धरुनियां उग्रता काहीं
उचटिलें तोंड मीं पाही। चिमुकलें
हळु दूध थोडके प्यालें। मग त्वरें तोंड फिरवीलें
कोंकरुं बावरुन गेले। साजिरें
स्वातंत्र्य जयांचे गेलें। परक्यांचे बंदी झाले
त्रिभुवनीं सुख न त्यां कसलें। की खरें
लटकून छातिशीं निजलें। तासही भराभर गेले
विश्व हें मुदित मग केलें। रविकरें
घेउनी परत त्या हातीं। कुरवाळित वरचेवरतीं
कालच्या ठिकाणावरती। सोडिलें
तों माता त्याची होती। शोधीत दूर शिशुसाठीं
दगडांचे तरुंचे पाठीं। हाय रे
हंबरडे ऐकं आले। आनंदुसिंधु ऊसळले
स्तनी शरासारखें घुसलें। किति त्वरें
डोलतो मुदित तरुवर तो। सप्रेम पक्षि हा गातो
तोकडा प्रतिध्वनि देतो। मुदभरें
हे प्रभो हर्षविसि यासी। परि मला रडत बसवीसी
मम माता कां लपवींसी। अजुनि रे

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

April Fools' Day राजा- राणीची कहाणी यापासून एप्रिल फूल साजरा करण्याची परंपरा सुरू झाली ! याला मूर्खांचा दिवस का म्हणतात?

cucumber soup बनवायला अतिशय सोपे काकडीचे थंडगार सूप रेसिपी

फक्त १५ दिवसांत वाईट कोलेस्ट्रॉल कमी करा! आजपासूनच हे ५ प्रभावी घरगुती उपाय करा

IRB GD Vacancy 2026: इंडियन रिझर्व्ह बटालियनमध्ये १०वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी कॉन्स्टेबल पदाची भरती

चेहऱ्यावरील काळपटपणा आणि टॅनिंग पूर्णपणे नाहीसे होईल! या मोसमी फळांचा वापर करा

पुढील लेख
Show comments