Marathi Biodata Maker

मराठी भाषा विभागाचे ४ सर्वोच्च पुरस्कार जाहीर

Webdunia
शुक्रवार, 4 जानेवारी 2019 (09:07 IST)
वर्ष २०१८ चा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ नाटककार श्री. महेश एलकुंचवार यांना आणि श्री. पु. भागवत उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार साहित्य प्रसार केंद्र या प्रकाशनास जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर या वर्षीचा डॉ. अशोक केळकर भाषाअभ्यासक पुरस्कार ज्येष्ठ भाषा वैज्ञानिक डॉ. कल्याण काळे यांना आणि मंगेश पाडगांवकर भाषासंवर्धक पुरस्कार झाडीबोलीचे अभ्यासक डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांना जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती मराठी भाषा मंत्री श्री. विनोद तावडे यांनी आज एका पत्रकाद्वारे दिली.
 
श्री . पु.भागवत  व विंदा पुरस्कार निवड समितीमधील सदस्य  श्रीपाद भालचंद्र जोशी,  बाबा भांड आणि पाडगांवकर व केळकर पुरस्कार समितीतील सदस्य डॉ. सदानंद मोरे, दिलीप करंबेळकर व बाबा भांड यांनी, प्राप्त झालेल्या प्रस्तावांवर चर्चा करुन, मा. मराठी भाषा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ह्या पुरस्कारांबाबत निर्णय घेतले.
 
मराठी भाषा गौरव दिनी म्हणजे दि. २७ फेब्रुवारी, २०१९ रोजी हे चारही पुरस्कार महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्या वतीने, मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहितीही श्री. विनोद तावडे, मंत्री, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य यांनी दिली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

शिळा सप्तमी विशेष: लोकप्रिय पारंपारिक नैवेद्य गुळगुळे आणि बाजरीची रबडी रेसिपी

मार्चमध्ये ही ३ झाडे लावा, उन्हाळ्यात भरपूर ताज्या भाज्या मिळतील, फक्त या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

Homemade Summer Drinks उन्हाळ्यात डिहायड्रेशन टाळण्यासाठी घरगुती शीतपेयांचा वापर वाढवा; तज्ज्ञांचा सल्ला

का अर्पण केला जातो शिळा नैवेद्य? जाणून घ्या शीतला सप्तमीचे शास्त्र आणि विशेष पदार्थ

Speech on Savitribai Phule in Marathi सावित्रीबाई फुले यांच्यावर मराठीत भाषण

पुढील लेख
Show comments