Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शांता शेळके...एक प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्त्व

shanta shelke
, सोमवार, 6 एप्रिल 2020 (19:26 IST)
शांता शेळके यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1922 रोजी पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे जनार्दन शेळके यांच्याकडे झाला. यांचे शिक्षण हुजूरपागा शाळा व स.प. महाविद्यालय पुणे येथे झाले. त्यांनी नागपुरातील हिस्लॉप महाविद्यालय, मुंबईतील रुईया आणि महर्षी दयानंद महाविद्यालयांमध्ये मराठीच्या अध्यापिका म्हणून काम केले. आचार्य अत्र्यांचा ''नवयुग'' मध्ये उपसंपादक म्हणून 5 वर्षे कार्य केले.

1996 साली आळंदीमध्ये अखिल भारतीय संमेलनाच्या अध्यक्षपदी त्याने कार्य केले. त्या एक प्रतिभासंपन्न मराठी कवयित्री, प्राध्यापक, संगीतकार, लेखिका, अनुवादक, बाल-साहित्य लेखिका, साहित्यिक आणि पत्रकार होय. अनुवादक, समीक्षा स्तंभ लेखिका, वृत्तपत्र, सह संपादिका म्हणून देखील यांचा साहित्यात मोलाचा वाटा आहे. शांताबाई या केंद्रीय फिल्म प्रमाण मंडळ तसेच राज्य नाटक परिनिरीक्षण मंडळाच्या त्या सदस्य म्हणून होत्या. डॉ. वसंत अवसरे या टोपण नावाने त्यांनी गीते लिहिली आहे. त्यांना अनेक कथा, कादंबऱ्या, कविता लिहिल्या आहे. त्यांचे निधन 6 जून 2002 रोजी झाले.

त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित केले आहे.
 
गदिमा गीतलेखन पुरस्कार 1996 
सुरसिंगार पुरस्कार 
केंद्र सरकारचा उत्कृष्ट चित्रगीत पुरस्कार (चित्रपट भुजंग)
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुरस्कार (2001) साहित्यातील योगदानाबद्दल दिले आहे.
 
यांच्यावर काही पुस्तके प्रकाशित झाल्या आहे.
आठवणीतील शांताबाई
शांताबाई
शांताबाईंची स्मृती चिन्हे.
 
शांताबाईंच्या नांवावर देण्यात आलेले पुरस्कार
* शांताबाईं शेळके साहित्य गौरव पुरस्कार (शांता शेळके प्रतिष्ठान मंचर) लेखक गोविंद गणेश अत्रे यांना 2015 मध्ये मिळाला.
* शांताबाईं शेळके पुरस्कार (मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान) कवियित्री प्रज्ञा दया पवार यांना 2008 साली मिळाला .
* सुधीर मोघे यांना शांताबाईं पुरस्कार 2007 साली मिळाला.
* शांताबाईं शेळके साहित्य पुरस्कार(मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय दादर विभाग) ललित लेखक व निबंधकार श्रीनिवास कुलकर्णी यांना 2013 मध्ये मिळाला होता.
* शांताबाईं शेळके साहित्य पुरस्कार(मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय दादर विभाग) 'पानिपत'कार विश्वास पाटील यांना 2014 साली मिळाला होता.
* शांताबाईं शेळके साहित्य पुरस्कार कवियित्री डॉ. प्रभा गणोरकर यांना 2012 साली मिळाला.
 
त्यांचे काही प्रसिद्ध गीते
* ऋतू हिरवा, ऋतू बरवा
* कळले तुला काही
* काटा रुते कुणाला
* काय बाई सांगू
* गजानना श्री गणराया
* गणराज रंगी नाचतो
* दिसते मजला सुखचित्र
असे अनेक अजरामर गीते त्यांच्या नाव आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शरीर आकर्षक आणि फिट दिसावं यासाठी सोपे उपाय