Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

लघुकथा म्हणजे काय?

लघुकथा म्हणजे काय?
, सोमवार, 19 एप्रिल 2021 (19:08 IST)
"आज समाजोपयोगी साहित्याची रचना करण्याची गरज आहे. समाजातील विसंगती, विद्रुपता, निगेटिव्हिटीतूनच लघुकथेचा जन्म होतो. समाजातील विसंगती सोबत एक  सुसंगती स्थापित करणे हा लघुकथेचा उद्देश आहे"
 हे विचार ज्येष्ठ साहित्यिक आणि लघुकथाच्या जाणकार डॉ वसुधा गाडगीळ ह्यांनी मांडले. त्या 18 एप्रिल रोजी आयोजित शॉपिज़न. इन (जागतिक साहित्यिक वेबसाइट) च्या फेसबुक पेज वर "लघुकथा म्हणजे काय" हा लाईव्ह कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. वसुधाजींचे प्रस्तुतीकरण फारच प्रवाही होते. प्रेक्षक अगदी शेवटपर्यंत जुळले राहीले, आणि कमेंट्सचा वर्षाव करत होते. 
 
या कार्यक्रमात डॉ वसुधा गाडगीळ ह्यांनी "लघुकथा कशी लिहावी" ह्यावर सविस्तर माहिती दिली. लघुकथेचे तत्त्व कथानक, शैली, संवाद, शीर्षक, शिल्प, शब्द ह्याचे विस्तृत विवेचन केले. अगदी साध्या आणि सोप्या भाषेत उदाहरण देत- देत वसुधाजींनी प्रेक्षकांच्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली. 
 
काही प्रसिद्ध लघुकथा लेखकांच्या लघुकथांचे अभिवाचन केले. त्यात अंतरा करवडे आणि स्व. सतीश दुबे ह्यांच्या लघुकथा प्रामुख्याने सामील होत्या. 
 
शॉपिज़न मराठी विभाग प्रमुख ऋचा दीपक कर्पे ह्यांनी सांगितले की आम्ही आपल्या वाचकांसाठी आणि लेखकांसाठी वेळोवेळी विविध स्पर्धा आणि कार्यशाळेचे आयोजन करत असतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

परंपरा जोपासावी लागते आदराने