दिले होते, असे सांगितले जाते. आपल्या गुरूच्या सल्ल्यानुसार, श्रावण शुक्ल नवमीच्या दिवशी ईश्वराचे नामस्मरण करत त्यांनी समाधी घेतली होती. आपली शेवटची इच्छा पूर्ण न झाल्यामुळे सहा महिन्यानंतर त्यांनी आपल्या शिष्यांच्या स्वप्नात जाऊन आपल्या देहाला बैठकीच्या स्वरूपात समाधी देण्याचे सांगितले होते. त्यानुसार पुन्हा त्यांच्या देह उकरून त्यांना बैठ्या रूपात समाधी देण्यात आली. सिंगाजी महाराजांचे समाधी स्थळ इंदिरा सागर परियोजनेच्या पाण्याखाली येत असल्यामुळे समाधी स्थळाच्या आजूबाजूला 50 ते 60 फूट उंचीचा ओटा तयार करून त्यावर मंदिराचे बांधकाम करण्यात येत आहे. मंदिराचे बांधकाम सुरू असल्यामुळे भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून महाराजांच्या चरण पादुका तात्पुरत्या स्वरूपात जवळील परिसरात स्थलांतरीत केल्या आहेत.
या समाधी स्थळावर दर्शनासाठी आलेले भाविक उलटा स्वस्तिक काढून आपली मनोकामना मागतात. आपली मनोकामना पूर्ण झाल्यानंतर भाविक सिंगाजींच्या दरबारात सरळ स्वस्तिक तयार करून अर्पण करतात. महाराजांच्या निर्वाणानंतर आजही त्यांची आठवण म्हणून शरद पोर्णिमेच्या दिवशी येथे जत्रा भरते. हजारो भक्त त्यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येतात.
कसे पोहचाल: रस्तामार्ग- या ठिकणी पोहचण्यासाठी खंडव्यापासून प्रत्येक अर्ध्या तासाला एक बस मिळते. रेल्वेमार्ग- खंडवा ते बीड रेल्वेस्टेशनपर्यंतच्या प्रवासानंतर, येथून पीपल्या गाव 3 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी शटल रेल्वेचीदेखील सुविधा आहे.