दिवसभरात कामाच्या भानगडीत महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. अनेक लोक योग, व्यायाम किंवा वॉक करत असल्या तरी एवढं पुरेसे नाही. आपल्याला योग्य आहाराची गरज देखील आहे. आहार योग्य नसल्यास शरीरात पोषक तत्त्वांची कमी राहते ज्यामुळे आजाराला आमंत्रण मिळतं. अशात वर्किंग वूमन असो वा हाउस वाइफ पर्फेक्ट डायट आपल्याला एनर्जी प्रदान करेल.
ब्रेकफास्ट
सकाळी आठच्या सुमारास नाश्ता करावा. ब्रेकफास्टमध्ये सांजा, ऑम्लेट, कॉर्न फ्लेक्स, ओट्स, म्यूसली यातून आपल्या आवडीप्रमाणे पदार्थ निवडणे योग्य ठरेल.
मिड-मॉर्निंग
अकरा वाजताच्या सुमारास अंडं, फ्रेंच टोस्ट, अंडं-टोस्ट, व्हेज सूप, लहान सँडविच, धिरडं, मिनी व्हेज पराठा किंवा 1 वाटी फ्रूट चाट घेणे योग्य ठरेल.
लंच
दुपारी दीडच्या सुमारास वरण-भात, भाजी-पोळी, कोशिंबीर दही किंवा ताक घ्यावे.
नून स्नॅक्स
मिल्कशेक, मूठभर रोस्टेट चणे किंवा दाणे, मुरमुरे, स्प्राउटेड धान्य घेता येईल.
डिनर
आठ वाजता रात्रीचे जेवण करत त्यात चिकन, मटण, पनीर, डाळ, भाज्या, सॅलड, दही किंवा ताक सामील करता येईल.
पूर्ण डायट मध्ये सकाळी आणि रात्रीच्या जेवणात फुलके दोन आणि तेही मल्टीग्रेनने तयार केलेल्या असल्यास उत्तम. आपण भाज्या, डाळ आणि सॅलड भरपूर प्रमाणात खाऊ शकतात.
हे देखील लक्षता ठेवा
आहारात पोषक तत्व जसे व्हिटॅमिन्स, जिंक, प्रोटीन, कॅल्शियम इतर सामील करावं. स्वत:ला हायट्रेड ठेवण्यासाठी दिवसात 10 ग्लास पाणी पिण्याची सवय असावी. आहारात लिंबू पाणी, नारळ पाणी, ग्रीन टी, ज्यूस सामील करावे.
मधे चहा-कॉफी घेण्याची सवय असल्यास त्याचे प्रमाण कमी असावे तसेच त्यात साखरेचे प्रमाण देखील कमी असावे.
तसेच ब्रेकफास्ट सोडून कधीच एनर्जी फिल करु शकणार नाही म्हणून कितीही व्वस्त असला तरी नाश्ता करणे गरजेचे आहे.