Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दिवाळीची शॉपिंग करण्या अगोदर लक्ष द्या!

वेबदुनिया
सणासुदीला बाजारात अतिशय उत्साहाचे वातावरण असते. करोडो रुपयांची उलाढाल होते, परंतु अशावेळी आंधळेपणाने
खरेदी केल्यामुळे फसगत होण्याची शक्यता असते. हे टाळावे म्हणून खरेदीला निघण्यापूर्वी पुढील गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे.

1986 च्या ग्राहक संरक्षण कायद्याने ग्राहकाला पुढील सहा महत्वपूर्ण अधिकार मिळालेले आहेत. सुरक्षेचाहक्क, माहितीचा हक्क, वस्तू किंवा सेवा आपल्या इच्छेप्रमाणे निवडण्याचा हक्क, ग्राहकाचे म्हणणे ऐकले जाण्याचा हक्क, तक्रार निवारणाचा हक्क, ग्राहक म्हणून जबाबदारी व कर्तव्ये पार पाडण्यासाठी ग्राहक शिक्षण मिळवण्याचा हक्क.

या हक्कांच्या आधारे आज सर्वसामान्य ग्राहक पुढील प्रकारच्या व्यवहारात तक्रार दाखल करून न्याय मिळवू शकतो.

खरेदी केलेल्या किंवा खरेदीच्या कराराने घेतलेल्या वस्तूंमध्ये दोष आढळणे.
भाड्याने किंवा भाड्याच्या कराराने घेतलेल्या सेवांबाबत त्रुटी किंवा उणिवा असणे.
अनुचित व्यापारी प्रथेने केलेले व्यवहार.
छापील किंमतीपेक्षा अधिक किंमत आकरली जाणे.
ग्राहकाच्या जीवाला किंवा सरुक्षिततेला धोका निर्माण होईल अशा वस्तूंची विक्री.
वरील हक्क आणि हक्कांची व्यापकता लक्षात घेऊन उपरोक्त प्रकारच्या तक्रारी बँका सेवा, आर्थिक सेवा, प्रवास, वीजपुरवठा, खाणावळी, हॉटेल्स, करमणुकीची साधने, माहिती प्रसारण, गृहनिर्माण, वैद्यकीय सेव ा, शिक्षण ‍तसेच टेलिफोन, रेल्वे, विमान सेवा, बस सेवा आदि सार्वजनिक सेवांच्या संदर्भात आढळून आल्यास ग्राहक याबाबतीत तक्रार करून अन्यायाचे निवारण करू शकतो.

ग्राहकांना हक्क प्राप्त झाले आहेत, परंतु त्यांची जपवणूक करण्यासाठी व ते बजावण्यासाठी ग्राहकांनी काही कर्तव्ये पार पाडायला हवीत.

ही पथ्ये अवश्य पाळा
केवळ आकर्षक जाहिरातीला भुलून खरेदीला उद्युक्त होऊ नका. आपल्याला हव्या असलेल्या वस्तूची प्रथम आपल्याला गरज आहे किंवा नाही हे निश्चित करा. गरज नसताना खेरदी करणे टाळा.
रोजची औषधे खरेदी करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे केव्हाही हितावह असते.
खाद्यपदार्थ किंवा वाण सामान घेताना त्यात काही भेसळ नाही, याची खत्र ी करून घ्यावी.
भेसळ कशी ओळखायची याची माहिती करून घ्यावी.
हल्ली शेव, चिवडा, वेफर्स, पापड इत्यादी वस्तू दुकानात उपलब्ध असतात. त्यांच्या उत्पादकांनी त्यात वापले जाणारे जिन्नस, त्या बनविण्याचे ठिकाण आदींची माहिती त्यांच्या वेष्टनावर नियमानुसार दर्शविलेली नसते. तेव्हा अशावस्तू आपल्या खात्रीच्या दुकानाशिवाय कोणाकडूनही घेऊन नयते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

भारतातील असे शहर जिथे एकही ट्रॅफिक सिग्नल नाही

नैतिक कथा : उपकारांची जाणीव ठेवा

घरी बनवा स्वादिष्ट Chicken Ghee Roast जाणून घ्या रेसिपी

प्रोस्टेट कर्करोग किती धोकादायक ? ज्याचे अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्ष बळी पडले

पगार ८११०० रुपयांपर्यंत, CISF मध्ये हेड कॉन्स्टेबल पदासाठी रिक्त जागा, त्वरित अर्ज करा

पुढील लेख
Show comments