Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जोडीदाराशी मतभेद झाले असल्यास या चुका करू नका

if
Webdunia
बुधवार, 17 मार्च 2021 (09:00 IST)
असं म्हणतात की ज्या जोडप्यांमध्ये भांडण असतात त्यांच्या मध्ये प्रेम देखील अधिक असते. परंतु बऱ्याच वेळा असे आढळून आले आहे की आपसातील मतभेद विकोपाला जातात आणि त्यामुळे वादाचे वितंडवात होऊन भांडणे विकोपाला जाऊन नात्यात दुरावा आणतात. अशा परिस्थितीत दोघानी समजूतदारीने घ्यायला पाहिजे. जेणे करून नात्यात काही दुरावा येऊ नये. आपले मतभेद जोडीदाराशी झाले असेल तर आपण या गोष्टी करणे टाळावे. जेणे करून मतभेद किंवा भांडणे संपतील. चला तर मग जाणून घेऊ या काय करू नये. 
 
* इतरांशी तुलना करू नका- भांडण झाले असेल तर असे बघितले जाते की भांडण करताना जोडपे एखाद्या दुसऱ्या जोडप्यांचे उदाहरण देतात असं करू नका. अशा मुळे भांडण अजूनच वाढतात. 
 
* कोणाला सांगू नका- आपल्यातील भांडण्याची चर्चा इतरत्र करू नका. अशा मुळे आपले नाते बिघडू शकतात. फोन वर देखील बोलताना जास्त हसू नका, या मुळे जोडीदाराला असे देखील वाटू शकते की आपण त्याचा कडे बघून हसत आहात. असं दाखवा की आपल्यामध्ये भांडण झालेच नाही. 
 
* जास्त बाहेर फिरायला किंवा खरेदीला जाऊ नका- आपले जोडीदाराशी भांडणे झाले असेल तर आपल्या मित्रांसह बाहेर फिरायला किंवा खरेदीला जाऊ नका. आपले तर मूड ठीक होईल पण आपल्या जोडीदाराचे मूड अधिकच खराब होईल. तर असे करणे टाळावे. आपण एकटे जाण्या ऐवजी आपल्या जोडीदाराला समजावून मनवून  गोड बोलून त्याला देखील फिरायला न्यावे. असं केल्याने आपले नातं देखील दृढ होईल. आणि आपसातील मतभेद आणि भांडणे संपतील.  
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Career in Pharmacy: 12 वी नंतर फार्मेसी मध्ये कॅरिअर करा

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

प्रेरणादायी कथा : लाल बहादूर शास्त्रींची हृदयस्पर्शी कहाणी

स्वादिष्ट मॅगी कशी बनवावी जाणून घ्या रेसिपी

पुढील लेख
Show comments