Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी या 7 सोप्या युक्त्या अवलंबवा

Webdunia
सोमवार, 28 मार्च 2022 (12:35 IST)
आजकाल प्रत्येक पालक तक्रार करतात की त्यांचे मूल दिवसभर मोबाईलला चिकटलेले असते. मात्र, याला कारणीभूत असलेले पालकही सतत मोबाइलमध्ये व्यस्त असतात आणि कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवण्या ऐवजी मोबाइलवर करमणुकीचे निमित्त शोधत राहतात. इतकंच नाही तर अनेक पालक आपल्या मुलांना लहान वयातच मोबाईल देतात आणि नंतर मुलांना याची सवय झाल्यावर ते त्यातून सुटका करण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू करतात. अशा परिस्थितीत घरातील वातावरण बिघडते, मुलं गुपचूप मोबाईल वापरायला लागतात.
 
एकट्याने मोबाइल पाहत असताना, अनेक वेळा ते इंटरनेटवरील अशी सामग्री देखील पाहू लागतात जे त्यांच्या वयानुसार त्यांच्यासाठी उपयुक्त नसते. अशा सामग्रीचा मुलांच्या मानसिक आणि शारीरिक विकासावर खोलवर परिणाम होतो आणि त्याचे दूरगामी परिणाम धोकादायक असू शकतात. त्यामुळे मुलांमधील मोबाईलची सवय दूर करण्यासाठी आपण काही उपयुक्त टिप्स अवलंबवू शकता. ज्या अवलंबवून आपण मुलांची मोबाईलची सवय कमी करू शकता.
 
1 मैदानी खेळांसाठी प्रेरित करा- मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांना मैदानी खेळ किंवा क्रियाकलापांमध्ये गुंतवणे. आपण त्यांना बाहेर खेळण्यासाठी, सायकलिंगसाठी, बागकामासाठी प्रवृत्त करू शकता.
 
2 लहान वयात मोबाईल देणे टाळा - लहान वयातच मुलांना मोबाईल देणे टाळलेले बरे. स्क्रीन वेळेसाठी फक्त टीव्ही वापरा.
 
3 वायफाय बंद ठेवा- आपले काम पूर्ण झाल्यावर, इंटरनेट किंवा वायफाय बंद करा. असे केल्याने, मुले सर्व वेळ इंटरनेट झोनमध्ये राहणार नाहीत आणि मोबाइल वापरण्यास सक्षम राहणार नाहीत.
 
4 दर्जेदार कौटुंबिक वेळ घालवणे- घरात चांगले वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा आणि एकमेकांसोबत दर्जेदार कौटुंबिक वेळ घालवा. आपण एकमेकांशी मस्करी करा, एकत्र मज्जा करा,  मजेदार स्पर्धा करा किंवा घराच्या सजावटीचे नियोजन करा. यामध्ये मुलांना सहभागी करून घ्या. जेणे करून ते व्यस्त राहतील.
 
5 स्क्रीन वेळ मर्यादित करणे- लहान मुलांसाठी 24 तासांमध्ये 2 ते 3 तास ​​स्क्रीन टाइम ठेवा आणि किशोरवयीन मुलांसाठी जास्तीत जास्त 4 ते 5 तास ठेवा जेणे करून ते त्यांचा अभ्यास करू शकतील. असे केल्याने ते इंटरनेटचा अधिक चांगल्या पद्धतीने वापर करू शकतील आणि  त्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होणार नाही.
 
6 मोबाईल पासवर्ड वापरा- आपण आपल्या फोनचा पासवर्ड नेहमीच बदलत राहा आणि मुलांना आपल्या परवानगी शिवाय फोन वापरण्याची सवय लावू नका.
 
7 घराबाहेर कामात व्यस्त ठेवणे - वाढत्या मुलांसाठी त्यांनी घराबाहेर काम करायला शिकणे महत्त्वाचे आहे. जर आपले  मुलं जास्त मोबाईल वापरताना दिसत असेल. तर त्याला प्रेमाने मदत करायला सांगा. आपण मुलांना घर स्वच्छ करण्यासाठी, सजवण्यासाठी, नाश्ता तयार करण्यासाठी, एखाद्याला मदत करण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. मुलं जितकी जास्त बिझी असतील तितका मोबाईलचा वापर कमी करतील.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

पनीर गुलाब जामुन रेसिपी

सीताफळाचे चमत्कारी फायदे जाणून घ्या

घरीच बनवा हा नैसर्गिक DIY फेस पॅक त्वचेवरील टॅन काढा

शरीराच्या या 5 ठिकाणी सूज आली तर होऊ शकतो किडनीचा त्रास जाणून घ्या

जीवनसाथी चांगला मित्र होण्यासाठी हे उपाय अवलंबवा

पुढील लेख
Show comments