आजकाल प्लॅस्टिकच्या भांडी बऱ्याच पैकी ट्रेंड मध्ये आहे. प्रत्येक जण स्टीलच्या भांड्यांना कंटाळला आहे त्यामुळे रंगीत भांड्यांकडे आकर्षित होतं आहे. सगळ्यांच्या स्वयंपाकघरात हे भांडी सहजपणे दिसून येतात. हे भांडी दिसायला जरी आकर्षक असले तरी सर्वात जास्त त्रास होतो ह्या भांडींना स्वच्छ करायला. दररोजच्या वापरल्याने ह्यामध्ये वास येतो आणि किती जरी स्वच्छ केले तरी ह्यावर हट्टी डाग राहतात .जे दिसायला खूपच घाण असतात. आज आम्ही आपल्याला ह्या भांड्यातील वास आणि हट्टी डाग काढण्याचे काही सोपे उपाय सांगत आहोत, चला तर मग जाणून घेऊ या.
1 बेकिंग सोडा-
आपल्या भांड्यांना चकचकीत करण्यासाठी आणि त्यामधील वास घालविण्यासाठी आपण बेकिंग सोडा वापरू शकता. या साठी एक बादली गरम पाण्यात तीन चमचे बेकिंग सोडा घालून चांगल्या प्रकारे मिसळून घ्या. या मध्ये प्लस्टिकची भांडी घालून बुडवून ठेवा.अर्ध्या तासानंतर या भांड्यांना स्क्रबच्या साहाय्याने घासून स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या.
2 व्हिनेगर-
प्लॅस्टिकच्या भांड्यावरील डाग आणि वास घालविण्यासाठी आपण व्हिनेगर देखील वापरू शकता. या साठी पाण्यात व्हिनेगर घालून भांड्यावर पाणी घालून ठेवा. थोड्या वेळानंतर हे भांडे स्क्रबरने स्वच्छ करा. असं केल्यानं भांड्यांवरील वास आणि डाग जातील आणि भांडे चकचकीत होतील.
3 लिक्विड क्लोरीन ब्लीच-
ब्लीच पासून कपड्यातील डाग तर सहज काढले असतील, परंतु आपल्याला हे ऐकून आश्चर्य होईल की या ब्लीच ने आपण भांड्यावरील डाग देखील काढू शकता. एवढेच नव्हे तर टिफिन मधून येणारा वास देखील दूर करण्यात मदत होईल. या साठी आपल्याला लिक्विड क्लोरीन ब्लीच वापरायचे आहे.
4 कॉफी -
वास येणाऱ्या प्लॅस्टिकच्या भांड्यांना स्वच्छ करण्यासाठी कॉफी वापरू शकता. या साठी कॉफी पावडर भांड्यांवर लावून ठेवा. नंतर भांडी घासा. असं केल्यानं भांडे चमकतील आणि येणारा घाणेरडा वास देखील दूर होईल.