महिलांना आपल्या बाळांना बाहेर दूध पाजणे अवघड जाते. परंतु या काही टिप्स अवलंबवून आपण सहजपणे बाहेर देखील बाळाला दूध पाजू शकता. चला तर मग जाणून घेऊ या
* व्यवस्थित कपडे घाला-
स्तनपानासाठी काही विशिष्ट प्रकारचे कपडे येतात. जे घालून आपण सहजपणे बाळाला दूध पाजू शकता.
* स्वतःला झाकून घ्या-
बाळाला दूध पाजताना स्वतःला ओढणी ने किंवा स्टोल ने झाकू शकता. असं केल्याने आपल्याला अस्वस्थ वाटणार नाही.
* बेबी स्लिंग किंवा बेबी रॅप घालू शकता-
हे घातल्यानं बाळाला सहजपणे दूध पाजू शकता.
* खाजगी क्षेत्रासाठी विचारा-
बाहेर काही क्षेत्र असे असतात ज्यामध्ये गरोदर स्त्रिया आणि दूध पाजणाऱ्या आईसाठी विशेष जागा बनविले असतात. अशा स्थळा बद्दल विचारा.