Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

चिंता आणि नैराश्य मधून बाहेर पडण्यासाठी हे करुन बघा

चिंता आणि नैराश्य मधून बाहेर पडण्यासाठी हे करुन बघा
, मंगळवार, 5 ऑक्टोबर 2021 (17:39 IST)
सध्याच्या कोरोनाविष्णुच्या साथीच्या रोगात चिंता आणि नैराश्य वाढत आहे. भीतीमुळे संकट उद्भवते आणि त्या मुळे चिंता होते आणि सतत काळजी किंवा चिंता केल्यामुळे नैराश्य येतं .अशा परिस्थितीत माणूस निरोगी असून देखील रोगी होतो. मनात भीती उत्पन्न होते.या पासून वाचण्यासाठी काही टिप्स सांगत आहोत.चला तर मग जाणून घेऊ या. 
 
1 सकारात्मक विचार सारणीच्या लोकांशी बोला- जर आपण काळजी आणि नैराश्याने वेढला आहात तर सर्वप्रथम सोशल मीडियापासून स्वतःला दूर ठेवा आणि आपल्या एखाद्या अशा व्यक्तीशी मोबाईलवर संभाषण करा जे सकारात्मक विचारसरणीचा आहे. ज्याच्याशी बोलून आपल्याला आनंद होईल.
 
2 संगीत ऐकावे -आपण सकारात्मक व्याख्याने ऐका, भजन ऐका किंवा आरामदायक संगीत ऐका. आनंदी आणि शांत ठेवणारे पुस्तके वाचा.हे मेंदू शांत ठेवते. 
 
3 प्राणायाम करा- चंद्रभेदी,सूर्यभेदी, भ्रामरी प्राणायामाला आपल्या दैनंदिनीचा भाग बनवा.हे सहजपणे शिकले जाऊ शकते. हे आपल्या सर्व काळजी आणि नैराश्याला दूर करतात. 
 
4 योग निद्रा- प्राणायामात भ्रामरी आणि दररोज किमान 5 मिनिटे तरी ध्यान करा.आपण शवासनात झोपून 20 मिनिटाची योग निद्रा घ्या. दरम्यान आपण आरामदायी संगीत ऐकू शकता. आपण दररोज योग निद्रा करत आहात तर हे आपल्यासाठी रामबाण आहे. या मध्ये श्वासाच्या हालचाली कडे लक्ष दिले जाते
 
5 प्रार्थना करा- आपल्या आयुष्यात जेवढे तणाव आणि नैराश्य असेल आपले आयुष्य कठीण होईल आयुष्याला सोपं करण्यासाठी भगवंतावर विश्वास ठेवा त्यांची प्रार्थना करा प्रार्थना केल्याने किंवा देवाची भक्ती केल्याने मनाला शांतता मिळते गीताचे वाचन करा .श्रीमद्भागवत गीता आपल्याला प्रत्येक संकटाशी लढण्याची शक्ती देते आणि मार्ग सुचवते. 
भगवान श्रीकृष्ण म्हणतात की आपल्याला नेहमी संकटाला संकट म्हणून नव्हे तर एक संधी म्हणून बघावे .
नैनं छिद्रन्ति शस्त्राणि नैनं दहति पावक: ।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुत ॥- (द्वितीय अध्याय, श्लोक 23)
अर्थात आत्म्याला अस्त्र आणि शस्त्र कापू शकत नाही, आग त्याला जाळू शकत नाही,पाणी त्याला ओलं करू शकत नाही. हवा त्याला वाळवू शकत नाही(इथे भगवान श्रीकृष्णाने आत्म्याला अजर अमर शाश्वत असण्याचे सांगितले आहे.  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रात्री काय खावे?