Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

जीन्स धुताना घेण्यात येणारी काळजी

जीन्स धुताना घेण्यात येणारी काळजी
जीन्स पँट हा आबालवृद्धांपासून सर्वांचाच आवडता पोशाख आहे. मात्र, बरेचदा धुताना आपल्या नवीन कोर्‍या जीन्स पँटचा रंग फिका होतो आणि आपला मूड ऑफ होतो. त्यामुळेच जीन्स धुताना थोडी खबरदारी घेतली तर नक्कीच ती दीर्घकाळ नव्यासारखी दिसू शकते.
 
जीन्स धुण्यासाठी नेही माईल्ड डिटर्जंटचा वापर करा. ज्याध्ये जास्त प्राणात कॉस्टिक सोडा आहे अशा डिटर्जंट किंवा ब्लीचचा वापर करणे टाळा. जीन्सला नेही थंड पाण्याने धुतले पाहिजे. कधीही जीन्सला गर पाण्याने धुवू नका. त्यामुळे जीन्सचा रंग निघून ती फिकी दिसते तसेच ती आकुंचन पावते. जीन्स धुण्यापूर्वी नेहमी तिला उलटी करून घ्या. जीन्सचा वरील भाग आतमध्ये व आतला भाग वरती घ्या. त्यामुळे जीन्स डॅमेज होण्याचा धोका कमी होतो. शिवाय प्रत्येक जीन्सवर तिला कसे धुतले पाहिजे याबद्दल एक टिप दिलेली असते. ती जरूर वाचा आणि त्याप्रमाणे खबरदारी घ्या. बरेचदा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. जीन्सला बाकी कपड्यांपेक्षा वेगळे धुवा. त्यामुळे कपड्यांचा रंग एकेकांना लागण्याचा धोका संभवणार नाही. जीन्सला हाताने धुणेच योग्य आहे. तसेच तिला जास्तवेळही धुता कामा नये. त्यामुळेही तिचा रंग फिका होतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पाळी टाळण्याचे सोपे उपाय