Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Mobile Tips and Tricks : मोबाईलचा पासवर्ड किंवा पॅटर्न लॉक विसरला,या सोप्या टिप्स अवलंबवा

Forget your mobile password or pattern lock
, सोमवार, 17 ऑक्टोबर 2022 (12:36 IST)
Mobile Pattern Unlock Tips: मोबाईल फोन ही आजची गरज बनली आहे असे म्हंटले तर कदाचित त्यात काही वावगे ठरणार नाही. जवळपास प्रत्येक व्यक्तीच्या हातात मोबाईल फोन तुम्हाला सहज दिसेल. शालेय वर्ग मोबाईलवर ऑनलाईन, एकमेकांशी बोलायचे असेल तर मोबाईल हवाच, ऑनलाईन बँकेशी संबंधित काम करायचे असेल तर मोबाईल, खरेदी, वीज बिल भरणे अशा अनेक कामांसाठी मोबाईल फोन उपयुक्त आहे. फोनमध्ये बँकिंग माहितीपासून इतर अनेक गोपनीय माहिती असते, ज्यामुळे लोक त्यामध्ये पॅटर्न किंवा पासवर्डचे लॉक ठेवतात. हे पासवर्ड विसरल्यावर काय करावे चला तर मग जाणून घेऊ या .
 
1 सर्वप्रथम तुमच्या मोबाईलच्या बाजूला दिलेल्या बटणाने स्विच ऑफ करा आणि एक मिनिट थांबा.
2 यानंतर तुम्हाला पॉवर स्विच आणि व्हॉल्यूम डाउन बटण एकाच वेळी दाबायचे.असे केल्याने मोबाइल 'रिकव्हरी मोड'मध्ये जाईल .
3 दोन्ही स्विचेस (व्हॉल्यूम डाउन आणि पॉवर बटणे) जास्त वेळ दाबून ठेवा  तुमचा मोबाइल रिकव्हरी मोडमध्ये जाताच. बटण दाबणे सोडा.
4 रिकव्हरी मोडमध्ये गेल्यानंतर, 'फॅक्टरी रीसेट' पर्याय निवडा. आता 'Wipe Cache' वर क्लिक करा. असे केल्याने, तुमच्या मोबाइल स्टोरेजमधील सर्व डेटा साफ होईल.
5 यानंतर, ही प्रक्रिया पूर्ण होताच, आपल्याला थोडा वेळ प्रतीक्षा करावी लागेल. नंतर  मोबाइल फोन पुन्हा चालू करा आता तो पासवर्ड शिवाय उघडेल.
 
Edited By - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

CISF Recruitment 2022: सैन्यात नोकरी करण्याची सुवर्ण संधी, तपशील जाणून घ्या