Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Office Tips: ऑफिसमधील सहकर्मचाऱ्यांसोबत चांगले संबंध ठेवायचे असतील तर या पद्धतींचा अवलंब करा

Webdunia
शनिवार, 30 एप्रिल 2022 (15:19 IST)
कोरोनाच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा कार्यालयात जुन्या पद्धतीने काम सुरू झाले आहे. आपण ही ऑफिसला जाण्यास सुरुवात केली असेल, तर आपण अनेक जुने-नवे चेहरे पाहिले असतील.आपण अर्ध्याहून अधिक दिवस ऑफिसमध्ये घालवता. अशा परिस्थितीत एकत्र काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी चांगले आणि सलोख्याचे संबंध असणे गरजेचे आहे. 
 
कार्यालयीन सहकाऱ्यांशी संभाषण सुरू करणे ही एक गोष्ट असली तरी त्यांच्याशी चांगले संबंध राखणे ही दुसरी गोष्ट आहे. सहकाऱ्यांमध्ये आपली चांगली छाप पडावी आणि त्यांचा आपल्यावर विश्वास असेल. असं करण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स सांगत आहोत.ज्यांना अवलंबवून आपण ऑफिस लाईफ चांगलं बनवू शकता. चला तर मग सहकाऱ्यांसोबत चांगले नाते निर्माण करण्यासाठी टिप्स जाणून घ्या.
 
1 टीमवर्कचीकाळजी घ्या- ऑफिसमध्ये काम करताना टीमवर्कची काळजी घ्या. एकमेकांना मदत करा. आपल्या कामाबद्दल प्रामाणिक रहा. तसेच सहकाऱ्यांच्या संपर्कात राहा. हे आणखी चांगले काम करेल. आपल्या सोबतच संपूर्ण संघाची कामगिरीही चांगली असेल.
 
2 गॉसिप करू नका- ऑफिसमध्ये आपल्या सहकाऱ्यांनी आपला आदर करावा आणि कामाचे वातावरण सकारात्मक राहावे असे वाटत असेल तर ऑफिस मध्ये गॉसिप करणे  टाळा. ऑफिसमध्ये लोकांच्या पाठीमागे टीका करू नका. असे केल्याने आपली  नकारात्मक प्रतिमा तयार होते. तसेच लोक आपल्या बद्दल वाईट गप्पा करतात आणि आपली निंदा नालस्ती करतात.
 
3 मतभेद झाल्यास संयम ठेवा- कार्यालयात वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक आहेत. प्रत्येकाची स्वतःची निवड किंवा विचार करण्याची पद्धत असते. आपले त्यांच्याशी वैचारिक मतभेद असू शकतात. अशा परिस्थितीत त्यांच्या मतांचा आदर करा आणि त्यांची चेष्टा करू नका. कोणतेही मतभेद टाळा. मतभेद असतानाही संयम ठेवा. कोणाचीही निंदा नालस्ती करू नका. 
 
4 सहकर्मचाऱ्यांना मदत करा- आपण आपल्या सहकार्‍यांसह दिवसाचे सुमारे 7 ते 8 तास असता. अशा परिस्थितीत त्यांना त्यांच्या चांगल्या-वाईट काळात साथ द्या. गरज असेल तेव्हा त्यांना मदत करा. जर कोणी कनिष्ठ कार्यकर्ता असेल तर त्याला शिकवा आणि चांगल्या कामासाठी प्रेरित करा. कोणाचा ही विश्वास तोडू नका 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

आरोग्यवर्धक खजुराचे लाडू रेसिपी

फ्रोझन शोल्डर म्हणजे काय? त्याची लक्षणे आणि कारणे जाणून घ्या

या DIY व्हिटॅमिन सी सीरमने पिगमेंटेशन आणि डाग निघून जातील, वापरून बघा

तुम्हीही जास्त वेळ उपाशी राहिल्यास तुमच्या शरीराला या 5 समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

जर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींवर भांडत असाल तर हे 3 रिलेशनशिप नियम वापरून पहा

पुढील लेख
Show comments