गरोदरपणात शरीरातच नव्हे तर त्वचेतही काही बदल होतात, जे आपल्या सौंदर्याला कमी करतात. अश्या परिस्थितीत आपण काही सौंदर्य टिप्स वापरून आपल्या सौंदर्याला टिकवून ठेवू शकता.
1 या अवस्थेत शरीरास अधिक पोषक घटकांची गरज असते, ज्यांची कमतरता आपले सौंदर्य कमी करू शकते, म्हणून आरोग्य आणि आहाराची विशेष काळजी घ्यावी. आपल्या आहारात दूध, दही, हिरव्या पाले भाज्या, डाळींचा समावेश करावा.
2 डोळ्यांसाठी व्हिटॅमिनने समृद्ध असलेला आहार घ्यावा, जेणे करून आपल्या डोळ्याच्या खाली काळे गडद वर्तुळे होण्याचा त्रास होणार नाही. या व्यतिरिक्त पुरेशी झोप घेणं.
3 या अवस्थेत, कॅल्शियमची कमतरता बाळासाठी हानिकारक असतेच आपल्याला देखील दातांचे त्रास उद्भवू शकतात, म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कॅल्शियम आणि व्हिटॅमिन सी घ्या.
4 पोट, नितंब, आणि स्तनांवर स्ट्रेच मार्क्स येतात. हे कमी करण्यासाठी बेबी तेलाने हळुवार हाताने मॉलिश करवून घ्यावी आणि शरीरास वाकविण्याऐवजी सरळ ठेवावं.
5 केसांना हानिकारक शॅम्पू करण्याऐवजी, मुलतानी माती, किंवा रीठा, आवळा, शिकाकाईने धुवावे आणि दोनतोंडी केस झाले असल्यास त्यांना ट्रिम करवून घ्या.