पावसाळ्यात पाण्याची अजिबात कमतरता नसते. अशा वेळी झाडांची विशेष काळजी घ्या. अतिरिक्त पाणी वाहून जाईल याची विशेष काळजी घ्या. कारण झाडांच्या मुळात पाणी साचून राहून झाडं कुजण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे पाण्याचा निचरा योग्य रीतीने होईल अशा कुंड्यांचा उपयोग झाडं लावण्यासाठी करावा.