Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्तनपान करताना या गोष्टींची काळजी घ्या

take precaution must keep in mind while breastfeeding स्तनपान करताना या गोष्टींची काळजी घ्या marathi article in webdunia marathi
, बुधवार, 3 मार्च 2021 (08:00 IST)
प्रत्येक आईला बाळाला स्तनपान करणे ही एक आनंददायी भावना आहे. ही अशी वेळ असते जेव्हा आई आणि बाळामध्ये एक घट्ट नातं निर्माण होत.परंतु आईने स्तनपानाच्या वेळी काही सावधगिरी बाळगली पाहिजे जेणे करून बाळाला कोणत्याही प्रकाराचा त्रास होऊ नये. चला तर मग जाणून घेऊ या. आईने कोणत्या प्रकारची काळजी घ्यावयाला पाहिजे. 
 
स्तनपान करणे देखील एक तंत्रज्ञान आहे. जर ते योग्यरीत्या केले नाही तर बाळालाच नव्हे तर आईला देखील त्रास होऊ शकतो. बऱ्याचवेळा काही स्त्रिया स्तनपान करताना फोनवर बोलत असतात हे चुकीचे आहे.  
 
* बाळाला डावीकडील बाजूस झोपवून दूध पाजा किंवा मांडीत 65 डिग्रीच्या कोनात असावा.पायाच्या खाली उशी ठेवा. जेणे करून बाळाच्या कानात दूध जाऊ नये. तसेच आपल्या स्तनाचा आकार देखील व्यवस्थित राहील. आपण स्तनपानाच्या वेळी घेतलेली काळजी बाळाला नेहमी हसरे ठेवेल.
 
* स्तनपानाच्या वेळी बाळाला झोपू देऊ नका-
बाळाला दूध पाजताना त्याच्या वर लक्ष ठेवा. बाळा मधूनच झोपतात त्यांचे पोट भरलेले नसते. जर बाळ झोपी जात असेल तर त्याच्या गालावर हळुवारपणे हात फिरवून जागे करा.
 
* बाळाचे पोट भरलेले असेल तरच तो शांत राहील. घाईघाईत त्याला दूध पाजू नका.या मुळे त्याचे पोट बिघडू शकते. 
 
* स्तनपान करणाऱ्या मातांना नेहमी सैलसर कपडे घालायला पाहिजे. घट्ट कपडे स्तनाची वेदना आणि संसर्गाला कारणीभूत असू शकते. 
 
*  स्तनाची स्वच्छता करावी-
स्तनाची स्वच्छता न करता बाळाला दूध पाजणे टाळावे, या मुळे त्याचे पोट बिघडू शकते. स्तन नेहमी कोमट पाण्याने धुऊन स्वच्छ करावे. 
 
* स्तनाला साबण लावू नका, असं केल्याने जर स्तन व्यवस्थित स्वच्छ झाले नाही तर साबण बाळाच्या तोंडात जाऊ शकतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नात्याला कमकुवत करतात या चुका