Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

स्ट्रेच मार्क्सहून सुटकारा मिळवण्यासाठी हे करून बघा

stretch marks
, शुक्रवार, 30 जून 2023 (22:38 IST)
Removing stretch marks प्रेग्नंसीनंतर महिला स्किनवरील स्ट्रेच मार्क्समुळे परेशान असतात. या दरम्यान शरीराचे वजन वाढतं आणि डिलेव्हरीनंतर वजन कमी होतं. या प्रक्रियेत त्वचेवर स्ट्रेच मार्क्स होऊन जातात. अनेकदा स्ट्रेच मार्क्समुळे महिला हवे ते कपडे परिधान करू पात नाही.
 
स्ट्रेच मार्क्सहून सुटकारा मिळवण्यासाठी महिला महागड्या क्रीम पासून अनेक घरगुती उपाय अमलात आणतात परंतू काही विशेष परिणाम हाती लागत नाही. यासाठी आज आम्ही आपल्या सांगत आहोत की कशा प्रकारे व्हिटॅमिन्स वापरून स्ट्रेच मार्क्सपासून सुटकारा मिळवता येऊ शकतो.
 
व्हिटॅमिन ए-
आपल्या आहारात व्हिटॅमिन ए युक्त वस्तू सामील करा. अनेक भाज्या जसे गाजर, फिश, एप्रीकॉट आणि बेल पेपरमध्ये कॅरीटिनच्या रूपात व्हिटॅमिन ए आढळतं. हे आपल्या त्वचेच्या रिपेयरिंगसाठी फायदेशीर ठरतं.
 
व्हिटॅमिन सी-
स्ट्रेच मार्क्सपासून सुटकारा मिळवण्यासाठी व्हिटॅमिन सी देखील आपल्या आहारात सामील करावे. हे आपल्याला त्वचेत कॉलेजन प्रॉडक्शन वाढवत असून नवीन त्वचा तयार करण्यास मदत करतं. लिंबू, आवळा, संत्रं, द्राक्ष, यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळतं. 
 
व्हिटॅमिन ई-
व्हिटॅमिन ई याला ब्युटी व्हिटॅमिन देखील म्हणतात. हेल्दी आणि ग्लोइंग त्वचेसाठी व्हिटॅमिन ई घेण्याचा सल्ला दिला जातो. पण याने डेमेज स्किन सेल्स रिपेयर करून स्ट्रेच मार्क्सपासून देखील 
 
सुटकारा मिळवता येऊ शकतो. आपण त्वचेवर व्हिटॅमिन ई युक्त बॉडी लोशन लावू शकता. रात्री झोपताना प्रभावित जागेवर व्हिटॅमिन ई कॅप्सूल लावता येऊ शकते. या व्यतिरिक्त आपल्या आहारात एवाकाडो, बदाम, पालक, मोहरीच्या बिया सामील करू शकता.
 
व्हिटॅमिन के-
व्हिटॅमिन के चे सर्व प्रकार स्ट्रेच मार्क्स दूर करण्यास मदत करतात. अनेक लोकांना या बद्दल माहीत नसेल. यासाठी आपण आपल्या आहारात स्प्राउट्स, कोबी, स्प्रिंग ऑनियन इतर सामील करू शकता. याने स्ट्रेच मार्क्सच नव्हे तर डार्क सर्कल्स दूर होण्यास देखील मदत मिळते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Yoga Tips: किडनी स्टोनच्या उपचारात हे तीन योगासने फायदेशीर आहे, नियमित सराव करा