Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Companions in the monsoonपावसाळ्यातील तुमच्या खास सोबती

rainy season
, गुरूवार, 20 जुलै 2023 (21:48 IST)
पावसाळ्यात दिवसात घराबाहेर पडल्यावर पाऊस आपल्याला केव्हा गाठेल हे सांगता येत नाही. अशा वेळी आपल्या बॅगमध्ये काही वस्तू असणे आणि वापरत्या वस्तूंमध्ये थोडा बदल करणे अत्यंत गरजेचे असते. 
rainy season
फुटवेअर : पावसाळ्यामध्ये सँन्डल्स घालणे सर्वात उत्तम ठरते. कारण यामुळे कपड्यांवर पाण्याचे शिंतोडे उडत नाहीत. तसेच आपल्यासोबत एक जास्तीची फुटवेअरची जोडी ठेवावी. कारणपाण्यातून किंवा चिखलातून चालताना चप्पल तुटू शकते. अशा वेळी एक जोडी असेल तर ती ताबडतोब घालता येते.
 
rainy season
वॉपरफ्रूट मेकअप : पावसाळा असला म्हणजे चार महिने मेकअप करायचा नाही असे होत नाही. त्यामुळे पावसाळ्यात वॉटरप्रूफ सौंदर्य प्रसाधने वापरावीत. खासकरून मस्कारा, लिपबाम, लिपग्लॉस, सनसिक्रन आणि मॉईश्चरायझरमध्ये बदल करावा.
 
rainy season
फोल्डेबल छ‍त्री : अशा प्रकारची छत्री ही अगदी हँडी असते आणि बॅगमध्ये ठेवून ती सहजपणे कुठेही नेता येते. अर्थात ही छत्री स्टायलीश असावी या कडे लक्ष द्यावे.
 
rainy season
कॉम्पॅक्ट रेनकोट : पारदर्शक वॉटरप्रूफ रेनकोट सहजपणे गाडीच्या डिकीत किंवा बॅगेत ठेवता येऊ शकतो. असा रेनकोट पावसाळ्यात नेहमीच सोबत ठेवावा.
 
rainy season
वेट वाईप्स आणि फेसवॉश : पावसातून एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर चेहरा पुसण्यासाठी नेहमी बरोबर वेट वाईप्स ठेवावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एकांत मिळावा, कधी कधी असं वाटत मला...