Dharma Sangrah

कहाणी गोड पदार्थांची...गुलाबजाम आणि जिलबी यांचे एकमेकांवर खुप प्रेम

Webdunia
शुक्रवार, 29 ऑक्टोबर 2021 (17:02 IST)
16
गुलाबजाम आणि जिलबी यांचे एकमेकांवर खुप प्रेम. दोघांनी नीट विचार केला आणि त्यांच्या आधी, त्यांच्या उपरोक्ष कोणी घरी सांगण्याऐवजी त्यांनीच आपले प्रेम प्रकरण आपल्या आपल्या घरी सांगून टाकले.
 
आता गुलाबजामचे वडील श्रीखंड आणि आई बासुंदी ही साधी माणस, रितीरिवाज जपणारी, सणवार सांभाळणारी आणि तरीही आधुनिकतेची जाणीव असणारी. त्यांचा फारसा विरोध झाला नाही..
 
जिलबीचे वडील बूंदीचे लाडू व आई ईमरती यांचा तसा प्रेम विवाह तरीही इमरतीचा याला नकार. इमरती जाम हट्टी .. कट्टर ...तिचा मात्र विरोध होता. त्याचे कारणही असे की तिची मुलगी जिलबी एवढी नाजुक-साजुक, कवळी काकड़ी सारखी, गोरीपान आणि त्याउलट गुलाबजाम गलेलठ्ठ, काळा सावळा आणि त्यात गुलाबजामचा मोठा भाऊ कालाजाम एक नंबरचा गुंड दिसायचा.
 
खुप समजून सांगितले पण इमरती काही ऐकेना. मग बूंदीच्या लाड़वाने आपल्या परदेशी मित्राला म्हणजे रसगुल्ला आणि त्याची पत्नी रसमलाई यांना मध्यस्थ घातले आणि इमरतीचा होकार मिळवला.
 
लग्नाची बोलणी सुरु झाली. बैठका झाल्या. याद्या झाल्या. देवाण घेवाणीचा प्रश्नच नव्हता. फक्त चार वयस्कांचे मानपान एकमेकांनी करायचे व वर्हाड़ी मंडळींना पंचतिखटीय, चटपटित, चमचमित, जेवण द्यायचे हे तय झाले.
 
आणि बघता बघता जिलेबी आणि गुलाबजामच्या विवाहाची तारीख निच्छित झाली.
 
बूंदीच्या लाडुचा गोतावळा मोठा, अगदी रव्यापासून, बेसन, शेंगदाणा ते मोतीचूर पर्यन्त सगळ्यांना निमंत्रणे गेली...
 
इमरतीने आपल्या बहिणीला, रबड़ीला, मदतीला बोलावून घेतले, तिच्या बरोबर लस्सीही आली.
 
इकडे श्रीखंडाने आपल्या मोठ्या भावाला आम्रखंडाला बोलावणे धाडले. बासुंदीची बहिण खीर आणि त्यांची सगळी मुलं, रवा, गवले, तांदूळ इत्यादि यांना बोलावले गेले.
 
बोलता बोलता लग्नाची तारीख येऊन ठेपली. मांड्याच्या पुरणपोळीचा मांडव घालण्यात आला. मुंबई हलव्याचे स्टेज तयार करण्यात आले. त्यावर छान सूंदर सोनपापडीचे जाजम अंथरण्यात आले. स्टेजच्या मागे वेगवेगळ्या प्रकारच्या चॉकलेटची फुले आणि तऱ्हेतऱ्हेच्या गोळयांच्या माळांनी आरास करण्यात आली. पिठीसाखरेची रांगोळी घालण्यात आली. स्टेजवर चढण्यासाठी काजुकतलीच्या पायऱ्या करण्यात आल्या.
 
हळूहळू पाहुण्यांनी मंडप भरू लागला. विविध प्रकारच्या बिस्किटाच्या, नानकटाइच्या खुर्च्या मांडण्यात आल्या. 
 
पाहुणे येऊ लागले. बालुशाही आपल्या राजेशाही थाटात मंडपात विराजमान झाली. वेगवेगळ्या बर्फीची लगबग सुरु झाली. कलाकंद, घेवर, मालपुवा, गुळपापड़ी इत्यादि मंडळी येवून विराजमान झाली.
 
बूंदी, शंकरपाळी, चिक्की ई. लहान लहान मुले उगाच इकडे तिकडे पळत दंगा करत होती. नुक्ती आपला जूना रुबाब कायम ठेवत दुरून सर्व बघत होती.
 
दूर कोपऱ्यात गावाकडून आलेले गोडीशेव आणि रेवड़ी आपले अंग चोरून एवढा तामझाम बघुन उगाच बिचकुन बसले होते.
 
सगळ्यांची नजर चुकवत शंकरपाळा, रसभरीत कुल्फिवर लाइन मारत मंडपात तिच्या मागे मागे फिरत होता. म्हैसूरपाक, गाजर हलवा आणि मुगडाल हलवा आल्या गेल्याचे स्वागत करत होते..
 
आमरस बाहेर गावी गेला असल्याकारणाने त्याची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती. तेवढ्यात कोणीतरी सांगितले की वरमाय रुसून बसली. शेवटी म्हाळसा सारखीच ती, तिची समजूत काढत तिला स्टेजवर आणण्यासाठी सुतारफेणीच्या पायघड्या घालण्यात आल्या. मग याद्यात् ठरल्याप्रमाणे थोऱ्या मोठयांचा म्हणजे करंजी, साटोरी, अनारसे, नारळीभात यांचा मानपान करण्यात आला. शिरा आणि त्याची बायको लापशी यांना 'मेहुण' म्हणून बोलावण्यात आले..
 
तेवढ्यात गुरूजी म्हणजे 'उकडीचे मोदक' यांनी विवाह समय जवळ आल्याची व वराला वधुला मंडपात आणण्याची आज्ञा दिली. गुलाबजामचे मामा पेढ़े आणि जिलबीचे मामा पेठा  वधुवरांना घेवून मंडपात आले. साखर फुटाण्यांच्या अक्षता वाटण्यात आल्या.
 
ग़ुलाबजामच्या पायावर पाकाचा अभिषेक करून पाद्य पूजन करण्यात आले. जिलबी वधु आपल्या नारंगी शालुत खुपच खुलुन दिसत होती. तिला केशराचा टिळा लावण्यात आला.
माहिम हलव्याचा अंतरपाट धरण्यात आला. मंगलाष्टके झाली. छोट्या छोट्या गोळ्याच्या माळांचा हार वधु वरांनी एकमेकांना घातला. लग्न लागताच पंच तिखट आणि चमचमित जेवणाच्या पंक्ती उठु लागल्या.
 
जेवणात समोसे, कचोरी, भेळ, पाणीपुरी, SPDP ढोकळा, ठेपले, बटाटेवडा, मिरची वडा अश्या अनेक पक्वान्नाचा फडशा पडत होता.
 
जेवणावळी नंतर, जिलबीची पाठवणीची वेळ आली. चॉकलेटची गाडी सजवली गेली. जिलबी जाताना आईच्या गळ्यात पडून रड़ू लागली. ते पाहताच तिच्या वडिलांच्या म्हणजे बूंदीच्या लाडुच्या डोळ्यात सुधारस दाटुन आला तो अलगद पुसत त्याने जिलबीला आशीर्वाद दिला.
 
चॉकलेटची गाडी जिलबी आणि गुलाबजामला घेवून रवाना झाली.
 
- सोशल मीडिया

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

शरीरात ऑक्सिजनची पातळी कमी होणे धोकादायक ठरू शकते, हे घरगुती उपाय करा

लघु कथा : दोन बेडकांची गोष्ट

हिवाळयात भाज्यांची ग्रेव्ही लवकर घट्ट होते का? हे सोपे उपाय वापरून पहा

आयलाइनर जास्त काळ टिकवायचे आहे, या टिप्स अवलंबवा

प्रजासत्ताक दिन विशेष मुलांसाठी बनवा 'तिरंगा' संकल्पनेवर आधारित चार विशेष पाककृती

पुढील लेख
Show comments