Festival Posters

निरागस बदल

पल्लवी डोंगरे
मंगळवार, 10 ऑगस्ट 2021 (14:48 IST)
अरविंद आणि पर्णा ह्यांना एक मुलगी असते व तिचे नाव आर्या. अरविंद म्हणजे एक व्यवसायीक आणि शिस्तप्रिय व्यक्ती. ह्या दोघांनाही इतर पालकांसारखं आपली मुलगी खूप यशस्वी व्हावी व स्वतःचे नाव काढावे अशीच अपेक्षा असते. त्यासाठी पर्णा सुद्धा वेळोवेळी आपल्या मुलीला संस्काराचे धडे देत असते. गरजेला हात मोकळे करीत पैसा खर्च करावा पण उधळ माप होऊ द्यायची नाही असे दोघे ही आर्याला शिकवत असत.
 
आर्या त्यांच्या शहरातल्या नावाजलेल्या शाळेत शिकत असते. आर्याचा वाढदिवस आला आणि तिने तिच्या दहाव्या वाढदिवसाला मैत्रिणींना घरी बोलवण्याचा गोड हट्ट धरला. पर्णाच्या मनगटांना काही त्रास असल्याने अरविंदने घरी काही ही न करण्याचे ठरवले. आर्या स्वतःही खूप समजदार असल्याने कुणालाही तिला दुखवावे असे नाही वाटले. मैत्रिणींना आपल्या वाढदिवसाला बोलवले की त्या खूप छान वागतात असा आर्याचा गैरसमज होता पण पर्णा तिला समजवत होती की वाढदिवसाला मैत्रिणींना बोलवणे ही आवड असू शकते पण ह्यानी मैत्री घट्ट होते ही समजूत चुकीची आहे. 
 
शेवटी अरविंदने ठरवले की आता काही का असे ना, आपण वाढदिवस बाहेर "हॉल बुक" करून साजरा करु. जवळचे नातेवाईक व वर्गातल्या मैत्रिणींबरोबर आर्याने वाढदिवस साजरा केला. त्यादिवशी आर्या खूप खुश होती. तिची शाळा यथोवत सुरू होती पण तिला शाळेत मैत्रिणींमध्ये फारसा फरक जाणवला नाही. मुली तशाच वागत होत्या जशा त्याआधी वागायच्या. हे पाहून आर्याला खूप वाईट वाटले. काही दिवसाने तिच्या शाळेने तिच्या संपूर्ण वर्गाला अनाथाश्रमात नेण्याचे ठरवले व विद्यार्थ्यांना सांगितले की तिथे जी लहान मुले आहेत, त्यांच्यासाठी कोणाला ही स्वेच्छेने खेळणी किंवा दररोज लागणारी गरजेची वस्तू द्यायची असल्यास आणावी व स्वतः त्या मुलांना द्यावी. अनिवार्य नाही पण द्यावयाची इच्छा असल्यास वस्तू आणून द्यावी. 
 
आर्याने ही गोष्ट घरात सांगितली. तिला अरविंद आणि पर्णाने तिथल्या लहान मुलांसाठी काही गोष्टी विकत आणून दिल्या. आर्या आनंदाने शाळेत गेली व वर्गासोबत त्या अनाथाश्रमात पोहोचली. तिथे खूप लहान मुले पाहिली. ती तिच्या जवळच्या वस्तू त्या मुलांना देऊ लागली पण कुठे तरी तिच्या बालमनाला या गोष्टींचा त्रास होत होता की ह्या मुलांकडे यांचे आई-बाबा, आजी-आजोबा हे कोणीही नाही तरी ह्यांना हसता येत होतं. ते तिथेही आनंदी होते.
 
आता मात्र आर्याच्या मनात काही नवीन विचार होते. ती घरी आल्यावर आईला बिलगून रडत होती. हळव्या स्वरात ती पर्णाला म्हणाली... आई.. माझ्या कडे सर्व आहे. घर, आई - बाबा, काका, आजी- आजोबा.. पण त्या मुलांना कोणीही नाही. ह्या पुढे मी माझा वाढदिवस त्या मुलांसाठी भेटवस्तू आणून व त्यांना देऊन साजरा करीन.
 
अरविंद आणि पर्णाचे डोळे आर्यात आलेल्या या बदलाने आनंदाने भरून आले होते.
 
- पल्लवी डोंगरे

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

दुपारच्या जेवणासाठी मसालेदार आणि रसरशीत मुगाची उसळ; उत्तम आणि पौष्टिक पर्याय

ओवा खाण्याच्या चुकीच्या पद्धतीने नुकसान होऊ शकते, योग्य पद्धत जाणून घ्या

पीएचडी आणि नेट (NET) शिवाय सुद्धा विद्यापीठात प्राध्यापक होऊ शकता, पात्रता जाणून घ्या

निर्दोष आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी तुतीचे फेसपॅक लावा

कुट्टूचे पीठ खाण्याचे चमत्कारिक फायदे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments