श्यामची आई हे पुस्तक पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेली मराठी आत्मकथा आहे. साने गुरूजींनी यात जिव्हाळा ओतून मातेबद्दल असणाऱ्या प्रेम, सन्मान, भक्ती आणि कृतज्ञता अशा अपार भावना मांडल्या आहेत. या पुस्तकातील कथा ही एक सत्यकथा आहे. श्यामची आई ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकमधील तुरुंगात लिहिली. त्यांनी या कथा लिहिण्यास 9 फेब्रुवारी 1933 रोजी सुरुवात केली आणि 13 फेब्रुवारी 1933 रोजी कथा लिहून संपविल्या.