Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

सफरचंद मालपुवा

recipe malpua
, शुक्रवार, 1 जुलै 2022 (12:30 IST)
साहित्य : चार मध्यम सफरचंद, वाटीभर शिंगाडा पीठ, अर्धा चमचा दालचिनी पूड, तीनशे ग्रॅम साखर, तळण्याकरता रिफाईंड किंवा साजुक तूप, पिस्ता, बदाम काप, तयार रबडी. 
 
कृती : सर्वप्रतम साल काढून सफरचंदाच्या गोल जाड चकत्या कराव्यात. शिंगाड्याच्या पिठात दालचिनी पूड घालावी. पाणी घालून सरसरीत भिजवावे. निर्लेप पॅनमध्ये तेल तापवावे. सफरचंदाचे स्लाईस शिंगाड्याच्या पिठात बुडवून गुलाबीसर तळावेत. दुसर्‍या कढईत साखरेत तीनशे ग्रॅम पाणी घालून पाक करावा. तळलेले स्लाईस गरम पाकात टाकावेत. निथळून डिशमध्ये मांडावेत. थंड झाल्यावर त्यावर थोडी थंड रबडी घालावी. बदाम पिस्ते काप टाकावेत. थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवून थंड करून खायला द्यावे. हा टेस्टी मालपुवा गरमही खाऊ शकता. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Men Skin Care Tips:कपाळावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी पुरुषांसाठी हे स्किन केअर फॉलो करा, चेहरा तरूण आणि सुंदर दिसेल